शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"कल्याणकरांचे कल्याण कधी होणार?"; आमदार राजू पाटील यांचा खरमरीत सवाल

By प्रशांत माने | Updated: September 10, 2023 15:20 IST

महिला प्रसूती प्रकरण; मनसे, ठाकरे गट आक्रमक

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिल्याप्रकरणी मनसे आणि ठाकरे गट चांगलेच आक्रमक झाले आहेत. शनिवारी रात्री मनसेने ठिय्या आंदोलन करून रूग्णालय प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान कल्याणकरांचे कल्याण कधी होणार की नुसत्याच स्मार्ट सिटीच्या आशेवर स्मार्ट लोकांच्या थापा अशी सडेतोड टीका मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनासह सत्ताधा-यांवर केली आहे. ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनेही रविवारी रूग्णालयात धडक देत प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.

शनिवारी रात्री एका महिलेला केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाच्या नजीक असलेल्या स्कायवॉकवर प्रसूतीवेदना सुरू झाल्या. नागरीक आणि पोलिसांनी तीला रूक्मिणीबाई रूग्णालयात आणले. मात्र रूग्णालयातील कर्मचा-यांनी महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला. तीची प्रसूती रूग्णालयाच्या प्रवेशद्वारातच झाली. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दिलेल्या वागणूकीचा मनसेकडून रात्रीच ठिय्या आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला गेला. संबंधित स्टाफवर कारवाईची मागणी देखील केली गेली. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील रूग्णालय प्रशासनाच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.

एका महिला भगिनीची प्रसूती सार्वजनिक ठिकाणी होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे म्हंटले आहे. प्रशासनसह सत्ताधा-यांवर तोंडसुख घेताना पाटील यांनी या घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हायला हवी अशी प्रतिक्रिया दिली. रविवारी सकाळी ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक विजया पोटे, मिना साळवे, शरद पाटील, रूपेश भोईर यांनीही रूग्णालयात धडक देत तेथील डॉक्टर आणि कर्मचा-यांना जाब विचारला. लवकरच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू असे आश्वासन मनपाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना दिले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे