शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय कसले, हे तर प्राथमिक उपचार केंद्र; गंभीर रुग्णांची धाव ठाणे, मुंबईकडे

By प्रशांत माने | Updated: August 16, 2023 11:14 IST

या रुग्णालयाची अवस्था  प्राथमिक उपचार केंद्रासारखी आहे.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली :  केडीएमसीचे डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय आहे. मात्र तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी गंभीर स्वरूपातील रुग्णांना ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयांची वाट धरावी लागते. रुग्णालयामध्ये मुबलक प्रमाणात औषधांचा साठा असल्याचा दावा केला जातो. मात्र गंभीर अवस्थेतील रुग्णावर उपचारच होत नसतील, तर त्याचा उपयोग काय, असा सवाल रुग्णांचे नातेवाइक करत आहेत. या रुग्णालयाची अवस्था  प्राथमिक उपचार केंद्रासारखी आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयाचा मंगळवारी आढावा घेतला. येथील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसली, परंतु स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने तो विभाग बंद होता. त्वचारोग, जनरल विभाग, डोळे तपासणी, अस्थिरोग, नाक-कान-घसा आणि दंत उपचार, ताप रुग्ण तपासणी विभाग, रक्तपेढी विभाग एरवी सुरू असले, तरी मंगळवारी ओपीडीसह तेदेखील बंद होते. डेंग्यूच्या रुग्णाला रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागल्याचे दिसले.

रुग्णालयात अतिदक्षता (आयसीयू) विभाग आहे, पण बंद आहे. बर्न विभाग नसल्याने भाजलेल्या रुग्णांना येथे दाखल करून घेतले जात नाही. रुग्णालयात प्रसूती विभाग आहे, पण नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) पूर्ण तयार होऊनही तो बालरोग तज्ज्ञाअभावी बंद आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

खासगी रुग्णालयांचा आसरा

एरवी रुग्ण गंभीर झाल्यावर त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय (शीव, मुंबई) या ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांमध्ये पाठविले जायचे. परंतु कळवा येथील रुग्णालयामध्ये सध्या ओढावलेली परिस्थिती पाहता इथले गंभीर रुग्ण सध्या सायन अथवा केईएम रुग्णालयात पाठवले जात आहेत.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीhospitalहॉस्पिटल