शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

६०० रुपये ब्रास रेतीच्या घोषणेचे काय? कल्याण-डोंबिवलीतील व्यावसायिकांचा शिंदेंना सवाल

By अनिकेत घमंडी | Updated: March 26, 2025 12:46 IST

रेती मिळत नसल्याने त्या ठिकाणाहून ती आणून बांधकाम पुढे न्यावे लागत आहे

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: राज्यात बांधकाम व्यवसायासाठी ६०० रुपये ब्रास रेती मिळेल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीड वर्षापूर्वी केली होती. मात्र, ती अद्याप उपलब्ध न झाल्याने व्यावसायिकांना गुजरात, नंदुरबार येथून चार हजारांपासून पुढे रेती मिळत आहे. रेती मिळत नसल्याने त्या ठिकाणाहून ती आणून बांधकाम पुढे न्यावे लागत आहे. सिमेंट, स्टील, अन्य साहित्य सगळे महागले असल्याने घरांचे भाव गगनाला भिडणार नाहीत तर काय, असा सवाल कल्याण-डोंबिवलीतील व्यावसायिकांनी केला आहे.

राज्य सरकारने रेती उपलब्ध करून देण्यासंदर्भात आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात रेती मिळाली नाही; त्यामुळे अनेकदा बांधकाम व्यावसायिक मिळेल तिथून रेती आणतात. अनेकदा खाडीकिनारीही रेती मिळते; परंतु ती बेकायदा असल्याने त्यावर तहसीलदारांमार्फत कारवाई होते. अनेकदा पोकलॅनसह, महागडी यंत्रे जप्त केली जातात. किनाऱ्यावर काढलेली रेतीही पुन्हा पाण्यात टाकली जाते किंवा जप्त केली जाते. 

कल्याण-डोंबिवलीत वर्षभरातून दोन ते तीन वेळा खाडीकिनारी तहसीलदारांमार्फत कारवाई केली जाते. राज्यात नदीपरिसरात रेती काढल्यास कारवाई केली जाते. त्यापेक्षा सरकारने रेती उपलब्ध करून दिल्यास बेकायदा रेती उपसा केला जाणार नाही, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

व्यावसायिकांसमोर पेच

गुजरातहून येणारी रेती महाग असून वाहतुकीचे भाडे द्यावे लागते. तिथे जरी रेती चार, पाच हजार ब्रास मिळत असली तरी वाहतूक खर्च, टोल पकडून प्रत्यक्ष  व्यावसायिकाला मिळेपर्यंत तो भाव सात हजारही होतो. त्यामुळे व्यावसायिकांसमोर रेतीची उपलब्धता हा मोठा पेच असल्याचे सांगण्यात आले.

राज्य सरकारने ६०० रुपये दराने ब्रास रेती मिळेल असे म्हटले होते. त्यासाठी लिलाव करण्यासंदर्भात कागदावर नियोजन झाल्याचे समजले होते. प्रत्यक्षात रेती दीड वर्षापासून मिळाली नाही. आता हा सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारावा लागेल. बांधकाम साहित्य प्रचंड महागले आहे. रेती हा मुख्य घटक असून त्यावर बांधकामाचा दर्जा ठरतो. सरकारी दरात रेती मिळणे गरजेचे आहे.-रवी पाटील, माजी अध्यक्ष, एमसीएचआय, कल्याण

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेdombivaliडोंबिवली