शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा मातोश्रीला घेराव घालणार; पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 20:15 IST

दि. बा.  पाटील विमानतळ नामकरण समितीचा इशारा. दि. बा. पाटील विमानतळ नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवली प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये आज एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

डोंबिवली पार पडली परिषद

कल्याण: नवी मुंबईविमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून थांबविले पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही. मातोश्रीला घेराव घालण्यात येईल. त्याचबरोबर पंतप्रधानाकडे दिल्ली येथे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले जाईल, असा इशारा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला आहे. 

दि. बा. पाटील विमानतळ नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवली प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये आज एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नामकरण समर्थन समिती कल्याण डोंबिवलीतर्फे  विमानतळ नामकरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. लालबावटा रिक्षा युनियन अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर,  समिती अध्यक्ष दशरथ पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजरुनबुवा चौधरी, कॉम्रेड कृष्णा भोयर, कॉग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवर उपस्थित होते. 

उपमहापौर गायकवाड यांनी सांगितले की, आत्तार्पयत झालेल्या 19 मुख्यमंत्र्यांनी त्यांचे नातेवाईकांची नावे विकास प्रकल्पाना दिलेली नाही.आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी देखील दि. बा. च्या नावाला विरोधकेला नसता. दि. बा. च्या नावासाठी  आगरी समाजाचे केंद्रात प्रथमच मंत्री झालेल कपील पाटील आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे आग्रही आहे. हे दोन्ही लोकप्रतिनिधी समाजाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. समाज निवडणूकीत त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.  काँग्रेसचे केणे म्हणाले, केंद्रीय उड्डाणमंत्री यांना भेटून आमची या विषयाची रास्त मागणी त्यांच्यासमोर ठेवणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये ही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ