शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक लढवायची का? राज ठाकरेंनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांची 'मन की बात'

By प्रशांत माने | Updated: February 23, 2024 21:01 IST

डोंबिवलीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारपासून कल्याण डोंबिवलीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी भिवंडी लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. यात पक्ष बांधणीसह लोकसभा निवडणूक लढवायची का? निवडणूक स्वबळावर की युतीमध्ये लढवायची याबाबत चर्चा केली. यावर निवडणूक लढविण्याकडे बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल दिसून आला. शनिवारी ते डोंबिवलीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

लोकसभा निवडणूकीची लवकरच घोषणा होण्याचे संकेत आहेत. सर्वच पक्ष युती आणि आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत असताना मनसेने देखील लोकसभा मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरु केली आहे. मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांवर राज ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी  ठाकरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष आदि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतची मतं जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, आमदार राजू पाटील आदी नेते बैठकीत उपस्थित होते.राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते दुर्गाडी येथे थांबले होते. याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाहनांचा ताफा रस्त्यावरून जात असतानाच मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटले राज ठाकरेच आले आहेत. त्यांनी लागलीच त्यांच्याकडील फटाके फोडण्यास सुरुवात केली  मात्र ते राज ठाकरे नसून ते कपिल पाटील असल्याचे समजताच तेथे एकच हशा पिकला आणि फटाके आणण्यासाठी पुन्हा धावपळ उडाली.पत्रकारांशी भाष्य करणे टाळले

पदाधिका-यांबरोबर बैठक घेऊन झाल्यावर ठाकरे तडक तेथून दुसरीकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी भाष्य करणं टाळले. उद्या ते कल्याण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी डोंबिवलीत बैठक घेणार आहेत. तेथे ठाकरे पत्रकार परिषद घेतील असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेkalyanकल्याण