शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अलका सावली प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने बेतूरकर पाडा परिसरात लसीकरण सुरु; पहिल्याच दिवशी ३५० नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 19:59 IST

अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले  यांच्या प्रयत्नाने कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील कै. बापूराव आघारकर शाळेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

कल्याण : अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले  यांच्या प्रयत्नाने कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील कै. बापूराव आघारकर शाळेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून शासनाने देखील काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी कोरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी कल्याण मधील अलका सावली प्रठीष्ठान प्रयत्नशील आहे. बेतूरकर पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असून येथील नागरिकांना लसीकरणासाठी इतरत्र धाव घ्यावी लागत होती. इतर केंद्रावर होणारी गर्दी, यामुळे नागरिकांचा बराचसा वेळ लसीकरणाच्या रांगेत जात होता.

नागरिकांची हि समस्या लक्षात घेऊन अलका सावली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुधीर वायले यांनी बेतूरकर पाडा परिसरात लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या या मागणीनुसार पालिकेने बेतूरकर पाडा येथील कै. बापूराव आघारकर शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आज पासून हे केंद्र सुरु झाले असून आज पहिल्याच दिवशी परिसरातील ३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आगामी काळात देखील हे लसीकरण केंद्र सुरु राहणार असून नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सुधीर वायले यांनी केले आहे.

       दरम्यान या लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या सुविधेसाठी यश महाजन, सागर वाघ, आकाश वायले, बंड्या कराळे, शरद शेलार, अजय पवार, अनिकेत वायले, तुषार देशमुख, सत्यम पाटील, मितेश बाऊस्कर, वैभव देशमुख, स्वप्नील गुरव आदींसह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.