शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘रिजन्सी ॲन्टिलिया’च्या क्लबहाउसचे अनावरण, क्लौडिया सिसेलाची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 00:24 IST

योग, झुम्बा, अरोबिक्स आदी सुविधा

डोंबिवली : कोडनेम कल्याण नेक्स्ट येथील ॲन्टिलिया या रिजन्सी समूहाच्या वसाहतीतील क्लबहाउसचे अनावरण रविवारी एका दिमाखदार सोहळ्यात झाले. त्यावेळी प्रख्यात अभिनेत्री क्लाैडिया सिसेला यांची विशेष उपस्थिती सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली.कल्याण परिसरातील दर्जेदार ठरणाऱ्या या संकुलातील क्लबहाउसच्या उद्घाटनप्रसंगी उल्हासनगरच्या महापौर लीलाबाई आशान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार कुमार आयलानी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, टीम ओमी कलानीचे प्रमुख उमेश कलानी हे मान्यवर अतिथी म्हणून या सोहळ्यास हजर होते. रिजन्सी समूहाचे सर्वेसर्वा महेश अगरवाल यांनी सगळ्यांचे स्वागत केले.

एक लाख ८० हजार चौरस फूट इतक्या विस्तीर्ण जागेत सहास्तरीय क्लबहाउस हे रिजन्सी ॲन्टिलियाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. संपूर्ण देशभरात हे क्लबहाउस एकमेवाद्वितीय असल्याचा दावा अगरवाल यांनी केला. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी इथे विविध प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. त्यात खेळाची मैदाने, उद्याने, कारंजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष, अद्ययावत व्याायामशाळा, झुम्बा-अ‍ॅरोबिक्स, योगसाधनेसाठी कक्ष, तरणतलाव आदी सुविधा असणार आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे धावपळीच्या जीवनात ताजेतवाने होण्यासाठी या क्लबहाउसमध्ये अनेक उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध असणार आहेत. क्वॅश, क्रिकेट, बॅडमिंटन, गोल्फ आदी क्रीडाप्रकार येथे असणार आहेत. उल्हास नदीचा किनारा संकुलापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे.क्लबहाउसमध्ये उत्तम सभागृह, बँक्वेट हॉल असून रहिवाशांना इथे डीनरचा आनंद घेता येईल. क्लबहाउस अनावरणाबरोबरच मुंबईतील नामवंत सलोन आणि स्पा ‘झोरो’ची शाखाही इथे कार्यान्वित होत आहे. गुणवत्ता आणि सौंदर्याची जोड असलेल्या विविध संकुल प्रकल्पांमुळे रिजन्सी समूहाने वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

खारघर, ठाणेसारख्या ठिकाणी विविध प्रकल्प  पुणे, लोणावळा, ठाणे, खारघर, कल्याण, डोंबिवली येथील रिजन्सीचे प्रकल्प त्याची साक्ष देतात. रिजन्सीच्या याच वैशिष्ट्यांमुळे नामवंत ब्रॅण्ड संकुल परिसरात येतात. सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील प्रमुख बांधकाम व्यावसायिकांमध्ये रिजन्सी समूहाचा समावेश होतो. गेल्या १९ वर्षांत २० हून अधिक प्रकल्प समूहाने साकारले. त्यात १७ हजार कुटुंबे समाधानाने राहतात.