शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव सेनेचा मॉकपोलला विरोध, न्यायालयात दाद मागणार; जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रेंचा निवडणूक आयोगाला इशारा

By मुरलीधर भवार | Updated: February 5, 2025 17:12 IST

जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी माजी खासदार राजन विचारे यांच्यासह आज ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली.

मुरलीधर भवार, डोंबिवली- विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी ज्या बूथवर मते कमी पडली. त्या बूथवरील मतांची पुन्हा माेजणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या मोजणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रिकाऊंटीगकरीता पैसे भरले हाेते. पैसे भरुन देखील आत्ता रिकाऊंटींग न करता मॉकपोल केले जाईल असे जिल्हाधिकाऱ््यांनी संबंधित पराभूत उमेदवारांना सांगितले आहे. उद्धव सेनेने त्याला कडाकडून विरोध केला आहे. मॉकपोलला विरोध असून रिकाऊंटींगच झाले पाहिजे अशी आग्रही मागणी केली आहे. अन्यथा निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी माजी खासदार राजन विचारे यांच्यासह आज ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, रिकाऊंटींग केले जाणार नाही. मॉकपोल केले जाईल असे स्पष्ट केले. मॉकपोलला उद्धव सेनेचा विरोध आहे. पराभूत उमेदवारांनी रिकाऊंटींगसाठी पैसे भरले आहेत. ही बाब निवडणूक आयोगाने पैसे भरण्यापूर्वीच स्पष्ट केली पाहिजे होती.

म्हात्रे यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. म्हात्रे हे पराभूत झाले होते. त्यांना काही बूथवर मिळालेल्या मतांविषयी संशय आहे. त्यांनी रिकाऊंटींगकरीता जिलाहाधिकारी कार्यालयाकडे पाच लाख रुपये भरले. पैसे भरुनही रिकाऊंटींग करण्यात येत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी शिनगारे यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. आत्ता पराभूत उमेदवारांना रिकाऊंटींगची तरतूद नसल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोग त्यांची भूमिका बदलत आहे. वारंवार नवे जीआर काढत आहे. बूथवरील सीसीटीव्ही फूटेजही दिले जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला जात आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना