शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानातील पावसामुळे दोन वृक्ष उन्मळून पडले

By अनिकेत घमंडी | Updated: November 11, 2023 12:54 IST

उद्यानाची झाली आहे दुर्दशा.

डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी मधील धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानात काल सायंकाळी/रात्रीचा वेळेस एकाच ठिकाणी दोन मोठे आकाशिया जातीचे वृक्ष पावसामुळे कोसळले. सुदैवाने त्यावेळी उद्यानात खेळण्यासाठी येणारी लहान मुले आणि फेरफटका, चालण्यासाठी येणारे वरिष्ठ नागरिक तेथे नसल्याने कोणतीही दुर्दैवी घटना झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच तेथेच जवळ राहणारे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आणि शिवसेना उपशाखाप्रमुख सागर पाटील यांनी अग्निशमनदलाला कळविले.

अग्निशमनदलाने सदर वृक्षांचा मोठ्या फांद्या तोडून ते उद्यानाचा कडेला एका बाजूस आणून ठेवले आहे. धर्मवीर आनंद दिघे बालउद्यान हे सन 2002 मध्ये तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली महापालिका यांनी एमआयडीसी कडून भूखंड घेऊन विकसित केले होते. सदर उद्यान उद्घाटनसाठी शिवसेना नेते मधुकर सरपोद्दार आणि धर्मवीर आनंद दिघे उपस्थित होते. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून 2017 साली याचे सुशोभीकरण करण्यात आले होते.

 याच धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानाची गेल्या तीन वर्षापासून अतिशय खराब दुर्दशा झाली असून झाडी झुडपे वाढली आहेत तर लहान मुलांची खेळणी मोडकळीस आलेली आहेत. उद्यानाभोवती असलेले सुरक्षा कुंपण/जाळी काही ठिकाणी तुटलेले आहे. यामुळे गैरप्रकार करणारे लोक रात्रीचा वेळेस यात प्रवेश करतात. या उद्यानातील झाडांच्या फांद्याची छाटणी वेळोवेळी केली गेली पाहिजे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा प्रकाश पडून येथे चालणारे गैरप्रकार थांबतील आणि भविष्यात झाडेही पडणार नाहीत. येथील स्थानिक नागरिकांनी केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना याबाबत कळवूनीही याची दखल घेतली गेली नाही आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने आणि त्यांचा पदस्पर्शाने निर्माण झालेल्या या बालउद्यानाची कमीतकमी देखभाल, दुरुस्ती, निगा ही केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन केली पाहिजे अशी अपेक्षा येथील निवासी भागातील नागरिक व्यक्त करीत असल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले.