शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये चरस तस्करी करणाऱ्या दोन पोलिसांना अटक

By मुरलीधर भवार | Updated: November 16, 2022 15:20 IST

अंमली पदार्थाची तस्करी करताना दोन पोलिसांनी ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या पोलिस पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे महेश वसेकर आणि रवि भिसे अशी आहेत.

कल्याण-अंमली पदार्थाची तस्करी करताना दोन पोलिसांना ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या पोलिस पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे महेश वसेकर आणि रवि भिसे अशी आहेत. हे दोन्ही पोलिस कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून ९२५ ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले आहे.

ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की, दोन जण कल्याणच्या दुर्गाडी चौकात चरस घेऊन येणार आहेत. ते कल्याणहून चरस घेऊन ठाण्याच्या दिशने जाणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी ठाणे नार्कोटीक्स विभागाच्या पोलिस पथकाचे अधिकारी संजय शिंदे यांनी दुर्गाडी चौकात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार दोन दुचाकी स्वार त्याठिकाणी आले. पोलिसांनी त्यांचा संशय होता.

पोलिसांनी त्यांना अडविले त्यांची बाईकसह तपासणी केली. त्यांच्याकडे ९२५ ग्रॅम चरस मिळून आले. ज्या दोन दुचाकी स्वारांकडे चरस मिळून आले ते दोघेही पोलीस होते. ही बाब कळताच नार्कोटीक्स पथकाचे पोलिस हैराण झाले या दोघांना पथकाने पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बाजारपेठ पोलिसांच्या हवाली केले. त्या दोघांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे अंमली पदार्थ विरोधात पोलिसांची कारवाई सुरु असताना त्याच कारवाईत चक्क दोन पोलिसांकडे चरस सापडल्याने कारवाई पथकही थक्क झाले आहे.

या दोघांकडे चरस कुठून आले असा प्रश्न निर्माण झाले आहे. हे दोघेही पोलीस कल्याणहून ठाण्याला ते चरस कोणाला देण्यासाठी किंवा विकण्यासाठी निघाले होते. हे दोघेही पोलीस कल्याण रेल्वे पोलिसात कार्यरत असल्याने काही दिवसापूर्वी कल्याण रेल्वे चरस मिळून आले होते. ही कारवाई बहुधा या दोघांनी केली असावी. ते चरस हे विकण्यासाठी जात असताना पकडले गेले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरण अन्य कोणाचा सहभाग आहे की नाही या अंगाने तपास पथक पुढील तपास करीत आहेत.