शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या दोन आरोपींना सव्वादोन वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 00:02 IST

कुंदन जोशी हत्या प्रकरणी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : जुलै २०१८ मध्ये दोन गटांत झालेल्या हाणामारीत कुंदन जोशी या ३२ वर्षीय तरुणाची हत्या झाली होती. याप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. नऊ आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली होती. परंतु, तीन आरोपी फरार होते. यातील दोघांना विष्णुनगर पोलिसांनी सापळा लावून बुधवारी अटक केली. विशाल सुरेश गायकवाड (वय २४) आणि अरविंद कामता प्रसाद राय (वय २१) ही अटक आरोपींची नावे आहेत. आणखी एका आरोपीचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच अटक करू, असा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी केला आहे.

व्हॉट्सॲपच्या मेसेजवरून दोन गटांंत हाणामारी झाल्याची घटना २९ जुलै २०१८ रोजी पश्चिमेकडील सखाराम कॉम्प्लेक्स रोडवर दुपारी पावणेतीनच्या दरम्यान घडली होती. या घटनेत कुंदन जनक जोशी यांचा मृत्यू, तर अन्य चौघेजण जखमी झाले होते. याप्रकरणी कुंदन यांचे पुतणे रोहित विनोद जोशी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून १२ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, यातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, तीन आरोपी अद्याप फरार होते. बुधवारी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक हद्दीत गस्त घालत असताना जोशी यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल गायकवाड आणि अरविंद कामता प्रसाद राय हे पश्चिमेतील शास्त्रीनगर भागात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे, पोलीस हवालदार युवराज तायडे, विनोद निकम, राजेंद्र बनसोडे, शशिकांत नाईकरे, पोलीस नाईक राजेंद्र पाटणकर, भगवान सांगळे, कुंदन भामरे, सचिन कांगूने आदींच्या पथकाने शास्त्रीनगर झोपडपट्टी, कोपर रोड परिसरात सापळा लावला. 

शनिवारपर्यंत कोठडी पोलिसांनी सापळा लावल्याची चाहूल लागताच दोघेही आरोपी पळू लागले. त्यांचा पाठलाग करून पकडण्यात पथकाला यश आले. दोघांना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :Murderखून