शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या प्रवेशानंतर विषय संपला, कल्याण पश्चिमेतून उद्धव सेनेकडून साईनाथ तारे इच्छूक

By मुरलीधर भवार | Updated: October 9, 2024 16:52 IST

माझ्या प्रवेशामुळे विषय संपला असल्याचा दावा उद्धव सेनेकडून कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या साईनाथ तारे यांनी  केला आहे. 

कल्याण-कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास महाविकास आघाडीकडून उमेदवार नाही. त्यामुळे महायुतीतून बरेच लोक इच्छूक होते. माझ्या प्रवेशामुळे विषय संपला असल्याचा दावा उद्धव सेनेकडून कल्याण पश्चिमेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या साईनाथ तारे यांनी  केला आहे. 

काही दिवसापूर्वी शिंदे सेनेला सोडचिठ्ठी देत तारे यांनी उद्धव सेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशाला उद्धव सेनेतून काही निष्ठावंतांनी विरोध केला होता. मात्र विरोध करणारे काही जण प्रवेशाच्या वेळी हजर होते. तारे यांनी कल्याण पश्चिमेतून निवडूक लढविणार असल्याचे जाहिर केले आहे. कल्याण पश्चिमेत शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आहेत.   लोकसभा निवडणूकीत कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून कपील पाटील यांना खासदार सुरेश म्हात्रे यांच्या विरोधात जास्त मते मिळाली होती. लोकसभा निवडणूकीपेक्षा विधानसभा निवडणूकीत गणिते वेगळी असतात. महाविकास आघाडीकडून कल्याण पश्चिम मतदार संघाची जागा कोणत्या पक्षाला जाते. याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडीकडून का’ंग्रेस पक्षाच्या कांचन कुलकर्णी, राजाभाऊ पातकर, राकेश मुथा, शिवसेना ठाकरे गटाकडून शहर प्रमुख सचिन बासरे इच्छूक आहे. अशा परिस्थितीत  कल्याण पश्चिमेतून उद्धव सेनेकडून तारे हे इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे सेनेचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यानी मतदार संघात काही कामे केलेली नाहीत अशी टिकाही तारे यांनी केली आहे. तारे यांच्या दाव्यानंतर महाविकास आघाडीच्या अन्य इच्छूकांची काय प्रतिक्रिया येते ? शिंदे गटाचे आमदार भोईर हे तारे यांनी केलेल्या टिकेला काय उत्तर देतात ? हे देखील महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024