शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

दारु पिऊन वाहन चालविले, खावी लागली जेलची हवा; कोर्टानं सुनावली शिक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 22:50 IST

तिघा मद्यपींना पाच दिवसांची कैद, कल्याण सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा

कल्याणः धुलीवंदनाच्या दिवशी दारु पिऊन वाहन चालविणा-या तिघा मद्यपींना  तुरुंगाची हवा खावी लागली आहे. शहर वाहतूक  उप शाखा कल्याणच्या पोलिसांनी आज तिघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दंड न भरल्याने त्यांना पाच दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात  करण्यात आली आहे.

१८ मार्चला धुलीवंदनाच्या दिवशी वाहतूक पोलीसांच्या वतीने ड्रंक अँड ड्राइव्ह ची विशेष मोहीम राबविण्यात आली. शहर वाहतूक उप शाखा कल्याणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या मोहीमेत २३ मद्यपी चालकांची धरपकड करण्यात आली होती. यातील १६ वाहनचालकांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना  प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावताना सहा महिन्यांसाठी संबंधितांचा वाहन परवाना रद्द केला  तर चार  जणांना वाहन परवाना नसल्याने दहा हजारासह अतिरिक्त पाच हजार रुपये दंड ठोठावला होता. दरम्यान उर्वरित तिघांना आज  न्यायालयात हजर केले होते. दहा हजाराचा दंड न भरल्याने त्यांना पाच दिवस साधी कैद ही शिक्षा ठोठावली. कोरोना चाचणीनंतर  त्यांची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती वपोनी तरडे यांनी दिली.

टॅग्स :Courtन्यायालय