शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची तिजोरी भरणारे उकाड्याने त्रस्त; एसी बंद असल्याने कोंडी

By पंकज पाटील | Updated: March 30, 2023 18:07 IST

एसी बंद असल्याने नागरिक -अधिकाऱ्यांची झालीये कोंडी

पंकज पाटील 

अंबरनाथ - घरपट्टीच्या माध्यमातून पालिकेची आर्थिक तिजोरी भक्कम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये देखील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इमारत देखणी झाली असली तरी त्या इमारतीमध्ये घरपट्टी विभागाचीच एसी बंद असल्याने कर्मचाऱ्यांसह कर भरणाऱ्या नागरिकांना देखील गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. अंबरनाथ नगरपालिकेने तब्बल 45 कोटी रुपये खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्वात आधी घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले. 

इमारतीत सर्वात आधी तळमजल्यावर असलेला घरपट्टी विभागातील कार्यालयाचे काम पूर्ण करण्यात आले होते. हे कार्यालय स्थलांतरित झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पालिकेतील इतर कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित झाले. मात्र नव्या प्रशासकीय इमारतीमधील जे कार्यालय सर्वात आधी स्थलांतरित झाले त्याच कार्यालयामध्ये आता नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. जे कार्यालय नंतर सुरू करण्यात आले त्या कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहेत. मात्र घरपट्टी विभागातील वातानुकूलित यंत्रणा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. मार्च अखेर असल्यामुळे या घरपट्टी विभागात शेकडोच्या संख्येने नागरिक घरपट्टी भरण्यासाठी येत आहेत. त्यामुळे दोन ते तीन तास रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना देखील एसी नसल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी नागरिकांना उभे राहण्याची सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी एसीची यंत्रणा असताना देखील ती अद्यापही सुरू न झाल्याने नागरिकांना देखील आहे त्या स्थितीतच कर भरून निघून जावे लागत आहे.

नागरिकांसोबतच या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याच गर्मीचा त्रास गेल्या अनेक दिवसांपासून सहन करावा लागत आहे. घरपट्टीसाठी भरण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा उकाडा आणखीनच वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांना घाम पुसतच या ठिकाणी पालिकेची आर्थिक तिजोरी भक्कम करण्याची वेळ आली आहे. दरम्यान या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता एसी का चालू नाही त्याची आपल्याला माहिती नसल्याचे प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे. घरपट्टी विभागातील वातानुकूलित यंत्रणा का सुरू झाली नाही याची माहिती आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथMuncipal Corporationनगर पालिका