शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 09:56 IST

कल्याण - डोंबिवलीचा निकाल ८७.६५%; ऑनलाइन निकालामुळे शुकशुकाट 

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च २०२३मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. कल्याण - डोंबिवली शहराचा निकाल ८७.६५ टक्के लागला आहे. मुलींचा गुणवत्तेचा टक्का ८९.५५, तर मुलांचा ८४.९१ इतका आहे. 

दोन्ही शहरात ९०६ केंद्रांवर बारावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी २० हजार ६३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २० हजार ५६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १८ हजार २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यात २ हजार १४६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. तर, ५ हजार १२४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७ हजार ७४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३ हजार १३ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कल्याण - डोंबिवलीतील २८ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ऑनलाइन निकालामुळे विद्यार्थ्यांची महाविद्यालयात सकाळपासून होणारी गर्दी, धाकधूक यावेळी कोठेही जाणवली नाही. 

गुरुनानक इंग्लिश हायस्कूलची परंपरा कायमकल्याण पश्चिमेतील गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाचा बारावी कॉमर्सचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला आहे. मागील पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून ही शंभर टक्के यशाची परंपरा अशीच सुरू असल्याचे प्राचार्या बलजित कौर मारवाह यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी सातत्याने शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थेचे पदाधिकारी वेळोवेळी सहकार्य करतात. या सर्वांनी मिळून मेहनत घेत यातूनच विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याने आणि मेहनतीने हे यश संपादन करण्यात महाविद्यालय यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.