शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागरीकांना या ३२ सेवा दिलेल्या मुदतीत प्राधान्याने द्याव्यात; केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचे आदेश

By मुरलीधर भवार | Updated: June 14, 2023 16:47 IST

हे आदेश कल्याण डाेंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

कल्याण- महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेशानुसार ३२ प्रकारच्या विविध सेवांचे कामकाज अतिशय दक्षतेने आणि जबाबदारीने विहीत मुदतीत करावे, असे आदेश कल्याण डाेंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

या सेवा नागरीकांना प्राधान्य क्रमाने द्याव्यात -मिळकती हस्तांतरण करणे, थकबाकी नसल्याचा दाखला, जन्म दाखला, मृत्यू दाखला, इमारतींना नळ जोडणी, विवाह प्रमाणपत्र देणे, मालमत्ता उतारा, जलनि:सारण नोंदणी देणे, इमारत बांधकाम परवाना/प्रारंभ प्रमाणपत्र, जोता पूर्णत्वाचा दाखला, झोन दाखला देणे, भेागवटा प्रमाणपत्र देणे, भाग नकाशा देणे, विविध व्यवसायाकरीता ना हरकत दाखला, विविध व्यवसायाकरीता अंतिम ना हरकत दाखला या १५ विविध प्रकारच्या सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशानुसार अधिसुचित करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त नळ कारागीर , प्लंबर यांना लायसन्स देणे, प्लंबर लायसन्स नुतनीकरण, सदोष मीटर बाबत तक्रार दाखल करणे, पाण्याच्या दाबाबाबत तक्रार दाखल करणे, अनधिकृत नळ जोडणी तक्रार , थकबाकी नसल्याचा दाखला, पाण्याच्या दर्जाबाबत तक्रार दाखल करणे, व्यवसाय व साठा परवाना, सर्व परवाने, परवानग्या नुतनीकरण (१ वर्षाने), नळ जोडणीचे मालकी बदलणे, नळ जोडणी खंडीत करणे, परवाना रद्द करणे, मिळकत कराची डुप्लीकेट बील देणे, मिळकत कर भरणे, मिळकत कराची डुप्लीकेट पावती देणे, पाणी बिल भरणे, डुप्लीकेट पाणी बिल देणे अशा १७ विविध प्रकारच्या महानगरपालिकेमार्फत देण्यात येत आहेत.कसूर आढळल्यास काय होईल कारवाई -या सेवा नागरिकांना पुरविण्याच्या त्यांची अंमलबजावणी करणारे पदनिर्देशित अधिकारी तसेच ती सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचा दृष्टीने प्रथम अपिलिय अधिकारी व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसुचित करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. शासन निर्देशानुसार या नागरी सेवांचे कामकाज प्राधान्याने हाताळावयाचे असल्याने याबाबतचे गांर्भीय लक्षात घेवून, तात्काळ कार्यवाही करणेबाबत सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी. यात कसूर आढळून आल्यास संबंधित अधिकारी व्यक्तिश: जबाबदार असतील. अशा जबाबदार अधिका-यांविरुध्द्व संबंधित प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी अधिसूचनेतील तरतुदीनुसार यथायोग्य कायदेशीर कार्यवाही पार पाडावी, असे आदेश महापालिका आयुक्त दांगडे यांनी काढले आहेत. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली