शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण- शीळ रोडवर पलावा उड्डाणपूलावरील गर्डर टाकण्यासाठी वाहतूकीत बदल

By मुरलीधर भवार | Updated: December 14, 2022 18:37 IST

कल्याण- शीळ रोडवर पलावा उड्डाणपूलावरील गर्डर टाकण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. 

कल्याण : कल्याण-शीळ रोडवरील लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पूल निर्माण करण्याचे काम चालू असून नवीन पुलाचे काम करण्यासाठी कल्याण फाटा कडून कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे .या पार्शवभूमीवर या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

१५ ते २२ डिसेंबर २०२२ रोजी पर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार असल्याने याकालावधी करीता सदर ररस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे .अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे पाेलिस अधिकारी रविंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

काय आहे बदल

  • प्रवेश बंद - कल्याण फाटाकडून कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
  • पर्यायी मार्ग - कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
  • प्रवेश बंद - कल्याण कडून कल्याण फाटा कड़े जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड - अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
  • पर्यायी मार्ग - कल्याण कडून कल्याण फाटा कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ही बदलापूर चौक- खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.

 मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदलमानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.डोंबिवली पूर्व साईबाबा सागाव चौक ते मानपाडा चौक दरम्यान रस्त्याचे खोदकाम करून कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सदर भागात वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरीता वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.

 

टॅग्स :kalyanकल्याणroad transportरस्ते वाहतूक