शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

काटई ते अंबरनाथ फाॅरेस्ट नाक्यापर्यंतचा प्रवास होणार वेगवान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

By मुरलीधर भवार | Updated: March 2, 2023 17:47 IST

काटई ते अंबरनाथ या मार्गातील खोणी ते फॉरेस्ट नाका येथील रस्त्याचे लवकरच काँक्रटीकरण होणार आहे.

डोंबिवली - काटई ते अंबरनाथ या मार्गातील खोणी ते फॉरेस्ट नाका येथील रस्त्याचे लवकरच काँक्रटीकरण होणार आहे. या रस्ते कामासाठी एमआयडीसीने ११६ काेटी ६४ लाख रुपयांच्या निविदा जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको नाका ते डीएनएस जंक्शन रस्त्याचेही काँक्रीटीकरण होणार असून यासाठी ९ काेटी ८२ लाख रुपयांच्या निविदा जाहीर केल्या आहेत.

या काम मार्गी लागण्याकरीता कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला आहे.काटई ते अंबरनाथ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. काकोळे येथील वालधुनी नदीवरील पुलाचे बांधकामही करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या मार्गावरून डोंबिवलीच्या दिशेने जाण्याचा आणि परतीचा मार्ग हा समांतर नसल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. या पुलाच्या उभारणी नंतर दोन्ही मार्गिका समांतर स्थितीत येणार असून यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्याचबराेबर डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको नाका ते डीएनएस जंक्शन आणि डोंबिवली औद्योगिक क्षेत्राबाहेरील रोटेक्स सेवा रस्त्याचेही काँक्रटीकरण होणार आहे. या रस्त्यावरून सद्यस्थितीत प्रवास करताना नागरिकांना त्रास हाेत हाेता. काटई खोणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी २०.४५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून हे कामही शेवटच्या टप्प्यात आहे. या कामासाठी खासदारांनी पाठपुरावा केला आहे. या रस्ते कामांना मंजुरी दिल्याने खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत याचे आभार मानले आहेत.

येत्या दोन वर्षात रस्ते सुस्थितीत होणारएमआयडीसी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या निविदेद्वारे खोणी ते फॉरेस्ट नाका हा ८ किलोमीटर रस्ता, डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील विको ते डीएनसी हा २ किलोमीटर रस्ता आणि औद्योगिक क्षेत्राबाहेरील रोटेक्स सेवा रस्त्याचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. ही कामे झाल्यावर प्रवास सुकर आणि वेगवान हाेणार आहे. त्यामळे नागरीकांना दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.