शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

By मुरलीधर भवार | Updated: June 6, 2023 18:35 IST

यावेळी दिवा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम ही पार पडणार आहे.

कल्याण - कल्याण खिडकाळी प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, डोंबिवली येथील आगरी कोळी वारकरी भवन प्रकल्प या दोन्ही विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवार ७ जून रोजी होणार आहे. 

यावेळी दिवा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम ही पार पडणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून सुमारे ही ३२५ कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लागत आहे. या विकासकामांच्या पूर्ततेनंतर या शहरांचे रूप पालटणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार  शिंदे यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. तर शहरांमधे अनेक नवनवीन प्रकल्प उभे राहत आहे. मतदारसंघातील तसेच शहरी भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, उद्यानांची उभारणी तसेच सुशोभीकरण, भुयारी गटार, मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मलनिःसारण प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण खिडकाळी येथील प्राचीन शिव मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून मंजूर करण्यात १०.१८ कोटी रुपयांच्या निधीतून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याच बरोबर डोंबिवली शहरातील बेतवडे परिसरात १५ कोटी रुपयांच्या निधीतून आगरी कोळी वारकरी भवनाची उभारणी करण्यात येणार आहे. खासदार डॉ. शिंदे यांच्या संकल्पनेतून या भवनाची उभारणी करण्यात येणार आहे. या भवनामध्ये प्रशस्त सभागृह, आगरी कोळी समाजाच्या विविध रूढी आणि परंपरा चित्रफित स्वरूपात दाखविण्यात येणार आहे. तसेच वारकरी संप्रदायासाठी भक्तिमय वातावरण, वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण घेण्याची सुविधा असणार आहे. या दोन्ही महत्वाच्या वास्तूंचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन पार पडणार आहे.

असे असेल वारकरी भवन आगरी, कोळी आणि वारकरी समाजाचा समृद्ध वारसा आणि कलात्मक परंपरा साजरे करण्यासाठी आणि त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी ही वास्तू उभारण्यात आली आहे.या ठिकाणी प्रशस्त असे सभागृह उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी अनेक कलावंतांना त्यांच्या कला सादर करता येणार आहे. या ठिकाणी कार्यशाळा, परिसंवाद आणि व्याख्याने तसेच आगरी आणि कोळी समाजाच्या पारंपारिक पद्धती, लोककथा, कला आणि हस्तकला, संगीत आणि पाककृती याबद्दल माहिती देणाऱ्या चित्रफित दाखविल्या जाणाऱ्या आहे.वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षण घेण्याची सुविधा असणार आहे. आगरी - कोळी आणि वारकरी संप्रदायाचे विविध स्वरूपात माहिती देण्यासाठी कलादालन

खिडकाळी मंदिर परीसराचे असे होणार सुशोभीकरण १२ ज्योतिर्लिंग या संकल्पनेवर आधारित त्रिशूळ आकाराचे उद्यान, मंदिराचे भव्य असे प्रवेशद्वार, वाहनांच्या पार्किंग करिता सुविधा, पूजा साहित्याची विविध दुकाने, मंदिर परिसरात घाट आणि एम्पी थिएटर, भाविकांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृह

दिवा शहरात काय ?दिवा शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण -खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दिवा शहरातील विविध विकासकामे मार्गी लागत आहे. यातील सुमारे २९९ कोटी ८८ लाख रुपयांच्या कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडणार आहे.या विकासकामांचा समावेश ,२२१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत नवीन मुख्य जलवाहिनी, देसई खाडी पूल, विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरणव्यायामशाळा, खुला रंगमंच, शाळा इमारत, आरोग्य केंद्र सामाजिक भवन, दातीवली तलाव सुशोभीकरण, देसाई गाव तलाव 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkalyanकल्याणShiv Senaशिवसेना