शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पश्चिमेत लवकर सुरू हाेणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

By मुरलीधर भवार | Updated: September 6, 2024 13:58 IST

आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली पाहणी.

मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे लवकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी आज शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी केली. हे हॉस्पिटल सुरु करण्यासाठी आमदार भाेईर यांनी पाठपुरावा केला होता.हॉस्पिटलसाठी गौरीपाडा येथे महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर ही तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्याठिकाणी १६ हजार चौरस फूटाची जागा आहे. १०० बेडचे हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे.

आमदार भोईर यांनी विधानसभा निवडणूकीच्या जाहिरनाम्यात कल्याण पश्चिमेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील जाहिर सभेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करण्यास होकार दिला होता. पीपीपी तत्वावर हॉस्पीटल उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सर्व अद्ययावत सुविधांसह हृदय विकारावरील उपचारांसाठी सुसज्ज अशी कॅथ लॅब ही उभारण्यात येणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सल्लागार नेमण्यात आला असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध केली होणार आहे.या रूग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत (आयुष्मान भारत अंतर्गत पात्र लाभार्थी) सर्व आजारांवर मोफत तर त्यात न बसणाऱ्या आजारांवर अत्यल्प दरांमध्ये उपचार केले जाणार आहेत.

या पाहणी दौऱ्यावेळी केडीएमसी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, साथरोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, माजी नगरसेवक गणेश जाधव, डॉ. धीरज पाटील उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, विभागप्रमुख अंकुश केणे, शाखाप्रमुख अशोक भोईर आणि केडीएमसीचे माजी उपआयुक्त प्रकाश गव्हाणकर उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याण