शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीमुळे धास्तावलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तीन अल्पवयीन मुले चौकशीसाठी ताब्यात

By प्रशांत माने | Updated: September 10, 2023 16:46 IST

मित्राने छेडछाड केल्याने धास्तावलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेत शनिवारी रात्री घडली.

कल्याण : मित्राने छेडछाड केल्याने धास्तावलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेत शनिवारी रात्री घडली. मित्र-मैत्रीणींसोबत असताना तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार घडला होता. दरम्यान याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना बाजारपेठ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चार दिवसांपुर्वी अल्पवयीन मुलगी तिच्या काही मित्र मैत्रीणींसमवेत मेट्रो मॉलमध्ये गेली होती. मॉलच्या नजीक एका मित्राचे घर असल्याने ते सर्व नंतर त्याच्याकडे गेले.

 तेथे ते सर्वजण हुक्का पियाले. त्यावेळी एका मित्राने इतरांना घराबाहेर थांबा असे सांगुन संबंधित मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगितले. त्यावेळी छेडछाडीचा प्रकार घडला. त्याला झिडकारले आणि नकार देत ती घरी परतली. या घडलेल्या प्रकारामुळे मुलगी प्रचंड धास्तावली होती. तीने घडलेला प्रकार तीच्या एका मैत्रीणीला सांगितला पण त्या घडलेल्या प्रकारापासून ती घरी कोणाशीच बोलत नव्हती. बहिण मानसिक तणावात दिसत असल्याने तिच्या भावाने तिला विचारणा केली. तेव्हा तीने भावाला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याने तीला समजावत घडलेला प्रकार आपण वडीलांना सांगू असे सांगितले. परंतू काही वेळातच तीने घाबरुन गळफास घेऊन आत्महत्या केली.

 या प्रकाराबाबत तीच्या घरच्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली असून पोलिसांनी भादंवि ३०६ , ३५४, ३४ पोक्सा ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करीत तपासाला सुरूवात केली आहे. यात तीघा अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुलीसोबत छेडछाड झाली की, तिच्यासोबत आणखी काही गैरप्रकार घडला आहे. हे तिच्या शवविच्छेदन अहवालापश्चात कळणार आहे. अहवालात काही आढळून आल्यास पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल अशी माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक सुनील पवार यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणDeathमृत्यू