शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणातील रखडलेले गृह प्रकल्प : माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतली आरबीआय संचालकांची भेट

By अनिकेत घमंडी | Updated: January 3, 2024 12:03 IST

गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

अनिकेत घमंडी, डोंबिवली: अनेक वर्षांपासून कल्याणात रखडलेल्या गृहप्रकल्पात भरडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नांसंदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेतली. 

कल्याणजवळील आंबिवली गावात 'रामराज्य' आणि 'स्वराज्य' हे इमारत प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून ठप्प पडले आहेत. साधारणपणे दशकभरापूर्वी या गृह प्रकल्पांच्या जाहिराती आणि विकासकांच्या भूलथापांना बळी पडून तब्बल १ हजार ३०० कुटुंबांनी यामध्ये पैसे गुंतवले. यापैकी अनेक जणांनी आपापल्याकडे असणारी सर्व आर्थिक जमापूंजी, दागदागिने मोडून आणि बँकेकडून मोठमोठाली कर्ज काढून याठिकाणी पैसे गुंतवले. मात्र गेल्या एक दशकाहून अधिक काळ या तेराशे कुटुंबियांच्या पदरी घोर निरशेशिवाय काहीच पडलेले नाही. इतकी वर्षे उलटूनही ही सर्व कुटुंबे आजही आपल्या हक्काच्या घराची वाट पाहत आहेत. 

आपल्याकडील सर्व पैसे याठिकाणी गुंतवले असूनही घर मिळण्याची आशा धूसर असताना दुसरीकडे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते मात्र त्यांना आजही फेडावे लागत आहेत. त्यासाठी हप्त्याचा तगादा लावणाऱ्या या बँकेकडून कर्ज घेण्यासाठीही संबंधित विकासकांनीच भरीस पाडल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विकासक आणि बँकेच्या संगनमताने गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय मिळावा. आणि बँकेच्या कर्जाचा बोज्यातून दिलासा मिळावा यासाठी आपण या गुंतवणूकदारांच्या प्रतीनिधिसह रिजर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेत त्यांचे मार्गदर्शन घेतल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

सतीश मराठे यांनी या गुंतवणूकदारांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले असून याप्रश्नी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिल्याचेही पवार यांनी सांगितले.  तसेच हा प्रश्न आपण शेवटपर्यंत धसास लावून यावर तोडगा काढू आणि गुंतवणूकदारांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असा विश्वासही माजी आमदार पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली