शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

By सचिन सागरे | Updated: December 18, 2022 16:13 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे तयार होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे पर्यावरणाची होणारी हानी

डोंबिवली :

पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे तयार होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देणारे प्रदर्शन विज्ञानोत्सवामध्ये सादर केल्याचे लोकमान्य गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी गार्गी चव्हाण या विद्यार्थिनीने सांगितले.टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा टिळकनगर विद्यामंदिर येथे रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. केडीएमसीचे शिक्षणाधिकारी विजय व्ही. सरकटे यांच्या हस्ते विज्ञानोत्सवाचे उद्घाटन झाले. 

या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेले सौरउर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, बायोगॅस सयंत्र, पर्यावरणस्नेही वातानुकूलित यंत्र यासारख्या विषयावरील प्रयोग ठेवण्यात आले होते. सदर विज्ञानोत्सवामध्ये केडीएमसी क्षेत्रातील तसेच ठाणे, रायगड, मुंबई आणि उपनगरातील सुमारे ३० शाळेतील ५५० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. 

विज्ञान या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतुहुल वाढविणे, नविन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे या उद्देशाने मंडळाचा शिक्षण विभागातर्फे विज्ञानोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध वैज्ञानिक खेळ, चित्रफीत, नवनवीन वैज्ञानिक तंत्रज्ञान याची अनोखी सफर विद्यार्थ्यांना या विज्ञानोत्सवाच्या माध्यमातून घडली.