शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

थुंकी अंगावर उडाली, जाब विचारणा-याची हत्या; आरोपीला अटक

By प्रशांत माने | Updated: December 11, 2022 17:46 IST

अंगावर थुंकी उडाल्याचा जाब विचारला म्हणून केलेल्या मारहाणीत विजय पटवा या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन च्या सुमारास घडली.

डोंबिवली:  

अंगावर थुंकी उडाल्याचा जाब विचारला म्हणून केलेल्या मारहाणीत विजय पटवा या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन च्या सुमारास घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी कैफ खान या १९ वर्षीय तरूणाला अटक केली असून त्याला रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ही मारहाणीची घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात राहणारे पटवा हे दुचाकीवरून दुपारच्या सुमारास चिंचोडयाचा पाडा परिसरातून जात होते. त्याच वेळेस रस्त्यावरून पायी चालत जात असलेला कैफ हा रस्त्यावर थुंकला. या दरम्यान मागून दुचाकीने येणा-या पटवा यांच्या अंगावर थुंकी उडाली. थुंकी अंगावर उडाल्याचा जाब पटवा यांनी कैफला विचारला. याचा राग कैफ ला आला आणि त्याने पटवा यांना शिवीगाळ करीत हुज्जत घालण्यास सुरु वात केली. त्यामुळे पटवा देखील संतापले. दोघांमध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या कैफ ने पटवा यांना लाथांनी ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पटवा हे रस्त्यावर खाली कोसळले यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागेवरच बेशुध्द पडले. त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्यांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरानी केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हत्या झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.