शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

एक सही कल्याण पुर्वेच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे स्वाक्षरी मोहीम

By प्रशांत माने | Updated: September 3, 2023 14:38 IST

'एक सही कल्याण पुर्वेच्या सुरक्षिततेसाठी' ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: पुर्व परिसरात गेल्या महिनाभराच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. तरुणांमधील अंमली पदार्थांचे व्यसन, टोळीयुद्ध, मुलींची छेडछाड, विनयभंग, हत्या तसेच सततच्या चोरीच्या घटना अशा गंभीर गुन्ह्यांनी कल्याण पुर्वेतील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी रविवारी 'एक सही कल्याण पुर्वेच्या सुरक्षिततेसाठी' ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत कल्याण पुर्व भागातील शिवसेनेच्या सर्व शाखांमध्ये ही स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. पुर्वेतील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या प्रमाणात सध्या अस्तित्वात असलेले कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस बळ अपुरे पडत आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेसाठी आणखीन एक स्वतंत्र पोलिस ठाणे असलेच पाहिजे अशी मागणी या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. आपली सुरक्षितता, एकजूट दाखवण्यासाठी कल्याण पुर्वेतील सुजाण नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेस भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्याकडून केले गेले होते.

टॅग्स :kalyanकल्याण