शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गट दहिहंडी साजरी करणार

By मुरलीधर भवार | Updated: September 6, 2023 15:50 IST

उच्च न्यायालयाचे आदेश.

मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी करण्यास पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्याला आपेक्ष घेतला होता. मात्र न्यायालयाने आज या याचिकेवर सुनावणी देताना ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी न करता शिवसेना शहर शाखेच्या बाजूला दहिहंडी साजरी करावी असे आदेश दिले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गट दहिहंडी साजरी करणार आहे. दहिहंडी उत्सव साजरा करण्यावरुन शिंदे गटाने ठाकरे गटावर कूरघोडी केली आहे.

हा निकाल लागताच शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह माजी नगरसेवक माेहन उगले, जयवंत भोईर, अरविंद मोरे आदी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास हार घालून घोषणाबाजी केली. फटाके फोडून न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी उत्सावाची जय्यत तयारी शिंदे गटाकडून सुरु आहे.

ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन छत्रपती शिवाजी चौकात गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना दहिहंडी साजरी करीत आहे. शिवसेनेत फूट पडून शिंदे आणि ठाकरे गट झाल्यावरही मागच्या वर्षी ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी होती. यावर्षी दहिहंडी साजरी करण्याची परवानगी पोलिसांनी शिंदे गटाला दिली आहे. पोलिस आणि महापालिकेच्या विरोधात ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. या याचिकेवर दोन्ही पक्षाच्या बाजू काल न्यायालयाने ऐकून घेतल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडी साजरी केल्यास वाहतूकीस अडथळा होतो. वाहतूक कोंडी होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असे मुद्दे उपस्थित केले गेले.

मात्र ठाकरे गटाच्या वकीलांनी जर ठाकरे गटाला परवानगी दिल्याने हे प्रश्न उद्भवू शकतात. तर शिंदे गटाला परवानगी दिल्याने सुद्धा हे प्रश्न उद्भव शकतात. पोलिसांनी ठाकरे गटाला छत्रपती शिवाजी महाराजा चौका ऐवजी अन्य ठिकाणी जागा सूचवा असे सांगितले हाेते. शिंदे गटाच्या वकीलाने सुनावणी दरम्यान ठाकरे गटाने शंकरराव चाैकात दहिहंडी साजरी करावी असे सूचित केले होते. ठाकरे गटाच्या वकीलांकडून ती जागा योग्य नसून त्याठिकाणी महापलिकेचे मुख्यालय आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांनी सूचविलेल्या पर्यायानुसार दुसऱ्या ठिकाणी ठाकरे गटाने दहिहंडी साजरी करावी असे सूचित केले. शिवसेना शहर शाखेच्या बाजूला दहिहंडी साजरी करावी असे आदेश दिले आहे.

यासंदर्भात ठाकरे गटाचे शहर प्रमुख बासरे यांनी सांगितले की, न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार होता. मात्र तितका वेळ नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पदाधिकाऱ््यांची बैठक घेऊन शिवसेना शहर शाखेच्या बाजूला दहिहंडी साजरी करायची की नाही हे ठरविले जाणार आहे.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीkalyanकल्याणShiv Senaशिवसेना