शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

पाय गमावलेल्या ‘त्या’ तरुणाच्या उपचारासाठी शिवसेना सरसावली; १ लाखाची मदत

By प्रशांत माने | Updated: May 26, 2024 17:35 IST

संपूर्ण उपचार होणार निशुल्क, कल्याण पूर्वेतील आमराई परिसरात राहणारे जगन (वय ३१) हे रात्री ९ वाजता दादर ते कल्याण असा लोकलने प्रवास करत होते.

कल्याण: लोकलमधून प्रवास करणा-या जगन जंगले या प्रवाशाच्या हातावर गर्दुल्याने फटका मारल्याने ते लोकलमधून खाली पडले. यात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. ठाण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या जगन यांच्या मदतीसाठी कल्याण पूर्वेचे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड धावले आहेत. त्यांनी एक लाखांची आर्थिक मदत सुपूर्द केली. त्यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने देखील मोफत उपचार करणार असल्याचे सांगितले आहे.

कल्याण पूर्वेतील आमराई परिसरात राहणारे जगन (वय ३१) हे रात्री ९ वाजता दादर ते कल्याण असा लोकलने प्रवास करत होते. ठाणे ते कळव्याच्या दरम्यान ते दरवाजात उभे असताना काही टवाळखोरांनी त्यांच्या हातातील मोबाईल खाली पाडण्याच्या उद्देशाने दांडक्याने जोरात आघात केला. दांडका हातावर जोरात बसल्याने तोल जाऊन जगन लोकलच्या खाली पडले. यात त्यांचे दोन्ही पाय ट्रेनखाली सापडले. सध्या त्यांच्यावर ठाणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.

कल्याण पुर्वेत भाडयाच्या घरात राहणा-या जगन यांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. दादर पश्चिम येथील एका बुक शॉप मध्ये महिना १५ हजार पगारावर खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत होते. परंतू दोन्ही पाय गेल्याने त्यांना अपंगत्व आले आहे. जगन यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता हॉस्पिटलचा खर्च हा आवाक्याबाहेरचा आहे. दरम्यान ही माहिती मिळताच कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख गायकवाड यांनी रविवारी हॉस्पिटलमध्ये धाव घेत जगन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कल्याण शहर कक्षप्रमुख चंद्रसेन सोनवळे, युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड, अक्षय गाडे उपस्थित होते. गायकवाड यांनी जगन यांच्या पुढील उपचारासाठी मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांची मदत केली. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीद्वारे सहकार्य केले जाईल असे गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्या भेटीनंतर हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक गोपाळ सिंह यांनी देखील जंगले यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करणार असून याअगोदर जमा केलेली रक्कम देखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परत करणार असल्याचे जाहीर केले.