शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव साजरा करण्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2022 17:42 IST

जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार याकडे दोन्ही गटांचे लक्ष

दसरा मेळाव्या पाठोपाठ कल्याणच्या किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव कोण साजरा करणार यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात वाद सुरु झाला आहे. दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली आहे. आत्ता जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले असून राजकीय वतरुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. 

१९६८ साली किल्ले दुर्गाडीवर पूजा अर्चा करण्यासाठी बंदी हूकूम जारी करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक बंदी हूकूम मोडून देवीची पूजा बांधली होती. तेव्हापासून आजर्पयत दरवर्षी किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शिवसेनेच्या नियमाप्रमाणे किल्ले दुर्गाडी देवीच्या नवरात्रोत्सवाचा अध्यक्ष हा शहर प्रमुख असतो. मात्र यंदा राजकीय स्थिती वेगळी आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आहेत. सगळीकडे या दोन्ही गटाकडून दावा सांगिता जात आहे. दसरा मेळाव्यावर या दोन्ही गटात जुंपलेली असताना आत्ता कल्याणमधील किल्ले दुर्गाडी देवीचा उत्सव साजरा करण्यासाठी विविध परवानग्या शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलीस प्रशासनासह जिल्हाधिकारी यांच्याकडे पवानगी मागितली आहे.

बासरे यांनी सांगितले की, पोलिस प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले की, त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला गेला आहे. त्यांच्याकडून परवानगी येणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शहर प्रमुख परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. परवानगी मिळताच उत्सव साजरा केला जाणार आहे. 

दरम्यान शिंदे गटाला समर्थन देणारे कल्याण  पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाकडे मागितली आहे. त्यांच्याकडूनही उत्सव साजरा करण्यावर दावा करण्यात आलेला आहे. नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या परवानगीवरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत. आत्ता जिल्हाधिकाऱ्यांकडून नवरात्रोत्सवाची परवानगी कोणाला मिळणार याकडे सगळ्य़ाचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान शिंदे गटाला समर्थन देणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी नवरात्र उत्सवानिमित्त किल्ले दुर्गाडी परिसरात स्वच्छचा करण्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप केला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना