मुरलीधर भवार/पंकज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ/ बदलापूर : अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले तरीही नगराध्यक्षपद गमावल्याने पक्षाच्या नेत्यांचे तोंड कडू झाले. तर कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेवरील शिवसेनेचा झेंडा उतरवून भाजपने आपला झेंडा फडकवला. अंबरनाथमध्ये स्वबळाच्या निवडणुकीत भाजपचा विजय हा शिंदेसेनेच्या पचनी पडलेला नाही. खा. श्रीकांत शिंदे यांना भविष्यात लोकसभा निवडणूक लढवताना भाजपची अंबरनाथमध्ये मदत घ्यावी लागणार आहे.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत तब्बल २० दिवस वाढीव मुदत देऊन निवडणूक घेण्यात आल्याचा फायदा भाजपने उचलला. काँग्रेसच्या उमेदवार नूतन पाटील यांनी २१ हजारांहून अधिक मते घेतल्यामुळे त्याचा फटका शिंदेसेनेच्या उमेदवाराला बसला. भाजपने कमी कालावधीत शहरभर प्रचाराची रचलेली रणनीती यशस्वी ठरली. शिंदेसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले असून, भाजपचे १४, काँग्रेसचे १२, अजित पवार गटाचे चार आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी विजय मिळवला.
कुळगाव-बदलापूर नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या रुचिता घोरपडे विजयी झाल्या. त्यांनी शिंदेसेनेच्या वीणा म्हात्रे यांचा पराभव केला. भाजप २३ आणि शिंदेसेनेला २४ जागांवर विजय मिळाल्याने यापुढेही येथील संघर्ष दररोज पाहायला मिळणार आहे. अजित पवार गटाला तीन जागा मिळाल्या असल्या, तरी समसमान जागा मिळवलेल्या भाजप व शिंदेसेनेला या पक्षाची दाढी कुरवळावी लागणार आहे.
शिंदेसेनेचा सहा हजार ७३१ मतांनी पराभवअंबरनाथमध्ये भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना ५४ हजार ८६ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदेसेनेच्या मनीषा वाळेकर यांना ४७ हजार ७१५ मते मिळाली. या लढतीत भाजपने शिंदेसेनेचा सहा हजार ३७१ मतांनी पराभव केला.
विविध कारणास्तव निवडणूक गाजलीआरोप-प्रत्यारोप, गोळीबार, बाहेरून बोगस मतदार आणणे अशा वेगवेगळ्या कारणांस्तव अंबरनाथमधील निवडणूक गाजली होती. अखेर भाजपने शिंदेसेनेला निवडणुकीत धूळ चारली. भाजपने अंबरनाथवर झेंडा फडकवल्याने शिवसेनेची दीर्घकाळ सत्ता असलेल्या या शहरात भाजपने पाय रोवला.
शरद पवार गट, काँग्रेस, मनसेला एकही जागा नाहीकुळगाव-बदलापुरात स्वबळाच्या लढाईत शरद पवार गट, काँग्रेस, मनसे यांना एकही जागा मिळाली नाही. सुरुवातीला महाविकास आघाडीने बळ दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यात फाटाफूट झाली. उद्धवसेनेच्या उमेदवार प्रिया गवळी यांना अवघी ५ हजार १२६ मते मिळाली, तर मनसेच्या संगीता चेंदवणकर यांना २ हजार १८ मते पडली. नगराध्यक्ष पदासाठी २ हजार २७ जणांनी ‘नोटा’ला पसंती दिली.
Web Summary : BJP won Ambernath and Kulgaon-Badlapur elections, defeating Shinde's Sena. Internal divisions hurt MVA, with BJP gaining ground in traditionally Shiv Sena areas. The election saw allegations and controversy.
Web Summary : भाजपा ने अंबरनाथ और कुलगाँव-बदलापुर चुनाव में शिंदे सेना को हराया। आंतरिक विभाजन से एमवीए को नुकसान, भाजपा ने शिवसेना के गढ़ में पैठ बनाई। चुनाव में आरोप-प्रत्यारोप हुए।