शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्या सोडविण्याकरीता  शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची केडीएमसी आयुक्तांना भेट

By मुरलीधर भवार | Updated: November 30, 2023 17:25 IST

कल्याण : कल्याण पूर्वेतील विविध समस्या मांडण्याकरीता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची ...

कल्याण: कल्याण पूर्वेतील विविध समस्या मांडण्याकरीता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची आज भेट घेतली.

कल्याण पूर्वे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, विधानसभा समन्वयक मल्लेश शेट्टी, शिवसेना उपशहर प्रमुख नवीन गवळी आणि माजी नगरसेवक पप्पू पिंगळे आदी उपस्थित होते.शहर प्रमुख गायकवाड यांनी सांगितले की, कल्याण पूर्वेत झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. येणाऱ्या काळात कल्याण पूर्वेची अजून दयनीय अवस्था होऊ नये. त्यासाठी या समस्या साेडवा अशी आग्रही मागणी केली. त्या बरोबर अंतर्गत रस्त्यांची कामे झाली पाहिजेत. जे रस्ते सहा फुटाचे आहेत. ते नऊ फूटाचे करण्यात यावेत. जे रस्ते नऊ फूटाचे आहे. ते १२ फूटाचे करण्यात यावेत. अनेक भागात पाणी कमी दाबाने येते. या विविध समस्या सोडविण्यात याव्यात. विधानसभा प्रमुख शिंदे यांनी सांगितले की, कल्याण पूर्वेतील अनेक प्रभागात कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे कचऱ््याची समस्या आहे. कचरा वेळेवर उचलला जावा. नागरीकांना त्याचा त्रास होता कामा नये. याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले.

दरम्यान पाणी सोडणारे महापालिकेचे व्हा’ल्वमन आहेत. त्यांना सण आणि सार्वजनिक सुट्ट्या मिळतात. त्यांच्या अन्य सुट्या नियमित केल्या जात नाहीत. सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना बदली रजा दिली जावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी आयुकतांकडे केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी गायकवाड यांना दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका