शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

शेअर रिक्षाचे प्रति सीट भाडे २० रुपये ही प्रवाशांची लूटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 23:35 IST

तेजस्विनी प्रवासी संघटना : १५ रुपये आकारण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद राहिल्याने सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला आहे. अनलॉकमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी अवघ्या दोन प्रवाशांसह रिक्षा व्यवसायाला परवानगी देण्यात आली. मात्र, शेअर भाडे घेणारे रिक्षाचालक आरटीओच्या मान्यतेनुसार, पहिल्या टप्प्यासाठी पूर्वीच्या १० रुपयांऐवजी २० रुपये घेत आहेत. वास्तविक, हे संयुक्तिक नाही. तीनऐवजी दोन प्रवासी म्हणजे आधीच्या १० रुपये भाड्याएवजी दोन प्रवासी प्रत्येकी १५ रुपये भाडे द्यावे, असा निर्णय व्हायला हवा, पण तसे नसल्याने सर्वसामान्यांची ही लूट होत आहे. ती थांबविण्यात यावी, अशी मागणी तेजस्विनी प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केली आहे.

अरगडे म्हणाल्या की, ‘शेअरने तीन प्रवाशांचे आधी तर नऊ रुपयेप्रमाणे २७ रुपये घेतले जात होते, तर स्वतंत्र रिक्षा केल्यास २० रुपये घेतले जायचे, पण आता त्या जागी ४० रुपये म्हणजे थेट डबल भाडे आकारले जाते, हे संयुक्तिक नाही. याबाबत आरटीओने पुन्हा विचार करायला हवा. सामान्य नागरिकांचेही हाल सुरू आहेत. त्यांच्याकडेही पैसे नाहीत. अनेकांचे नोकरीधंदे गेले आहेत, त्यांचाही विचार करायला हवा.’त्या पुढे म्हणाल्या, ‘बहुतांश रिक्षाचालक तीन प्रवासी घेतात. एखादाच दोन प्रवासी घेत असेल, पण भाडे कोरोना काळात ठरवून दिले आहे ते घेतात, हे नियमबाह्य आहे. आरटीओ यावर कारवाई करत नाही. त्यामुळे शेअरला तीन प्रवासी घेतले, तर पहिल्या टप्प्यासाठी १० रुपये, तर दोन प्रवासी घेतले १५ रुपये प्रति सीट आकारावेत. सामान्यांचाही विचार करावा.’

‘प्रसंगी आंदोलन करू’आरटीओ, रिक्षाचालक याबाबत सुधारणा करणार नसतील, तर त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी लागणार आहे. वेळ पडल्यास प्रवासी हितासाठी आंदोलनाचा पवित्राही घ्यावा लागल्यास, त्यासाठी तयारी असल्याचे अरगडे म्हणाल्या.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाdombivaliडोंबिवली