शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतरही उद्यान कुलुपबंदच! ज्येष्ठ नागरिकाचे खासदारांना पत्र; दुरावस्थेकडेही वेधले लक्ष

By प्रशांत माने | Updated: October 4, 2023 17:51 IST

कोरोनाच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीतील सर्वच उदयाने बंद ठेवण्यात आली होती.

डोंबिवली : कोरोनाच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीतील सर्वच उदयाने बंद ठेवण्यात आली होती. निर्बंध शिथिल होताच टप्प्याटप्याने ती खुली केली गेली परंतू येथील पुर्वेकडील टिळकनगर प्रभागातील विश्राम उदयान आजही कुलूपबंद आहे. सुरक्षारक्षकांच्या कमतरेमुळे उदयान खुले केले नसल्याचे कारण केडीएमसी प्रशासनाकडून दिले जात असलेतरी ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने उदयान खुले करण्याबाबत थेट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना पत्रव्यवहार केला आहे.

रस्त्यावर वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीत सकाळ-संध्याकाळ वॉक करण्यासाठी नागरिक विशेष करून ज्येष्ठ नागरिकांकडून उदयानांचा आधार घेतला जातो. कल्याण डोंबिवलीत मनपा अथवा लोकप्रतिनिधींसाठी राखीव असलेल्या निधीतून उदयाने उभारली आहेत. उदयान उभारणीसाठी लाखो रूपये खर्च झाले आहेत परंतू डोंबिवलीतील विश्राम उदयान कोरोनानंतर आजही कुलुपबंद असल्याने ते बिनउपयोगी ठरत आहे. हे उदयान कुलुपबंद असलेतरी त्याची नियिमतपणे साफसफाई केली जात असे परंतू साफसफाईकडेही दुर्लक्ष झाल्याने उदयानात रान वाढले असून सुक्या फांदया आणि पालापाचोळा यांचे ढिग लागले आहेत. कुलुपबंद उदयानाच्या गेटच्या बाहेर दुचाकींचे पार्किंग होत आहे. 

मनपाच्या उदयान विभागाच्या दुर्लक्षतेमुळे या उदयानाला एकप्रकारे अवकळा आली असताना ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिक विनायक रत्नपारखी यांनी उदयानाच्या या अवस्थेकडे कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. लवकरात लवकर उदयान खुले करण्यासाठी लक्ष घालावे हि मागणी करताना रत्नपारखी यांनी संबंधित उदयान देखभालीअभावी ‘कचराकुंडी’ झाल्याचे म्हंटले आहे. नजीकच्या परिसरात असलेले गावदेवी मंदिर परिसरातील नाना-नानी पार्क या उदयानात सकाळ-संध्याकाळ गर्दी होत असल्याने ती जागा अपुरी पडत आहे. अखेर वॉक करण्यासाठी रस्त्याचा आधार घ्यावा लागतोय याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ...तर ज्येष्ठांचे आशिर्वाद लाभतीलविश्राम उदयान बंद असल्याने ज्येष्ठांना मानपाडा रोडवरील नाना-नानी पार्कची वाट धरावी लागत आहे. मनपाचे विश्राम उदयानाकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. आपण यात लक्ष घालून हे उदयान सुस्थितीत चालू करून दयावे. आपणास ज्येष्ठ नागरिकांचे आशिर्वाद लाभतील असेही रत्नपारखी यांनी पत्रात नमूद केले आहे.  

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMember of parliamentखासदार