शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

लोकांना फसविणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त करा

By मुरलीधर भवार | Updated: December 16, 2024 09:37 IST

कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांचे एकत्रीकरण करून १९८३ साली  महापालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत या महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न कायम आहे.

मुरलीधर भवार, प्रतिनिधी

कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांचे एकत्रीकरण करून १९८३ साली  महापालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत या महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न कायम आहे. त्यावर आतापर्यंत आलेल्या आयुक्तांनी कोणताही ठोस तोडगा काढला नाही. ही बेकायदा बांधकामे जमीनदोस्तही केली नाहीत. फक्त यातून सामान्य नागरिकांची फसवणूक झाली. उच्च न्यायालयाने बेकायदा प्रकरणात वेळोवेळी कारवाईचे आदेश दिले. मात्र, ज्या बिल्डरांनी ही बेकायदा बांधकामे केली. त्यांच्या मालमत्ता जप्त करून फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांची आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश न्यायालयाकडून दिला जाणे आवश्यक आहे. 

महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामप्रकरणी २००४ साली कौस्तुभ गोखले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायालयाने अग्यार समिती नेमली. या अग्यार समितीने १९८३ ते २००९ या कालावधी झालेल्या बेकायदा बांधकामांचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार २००९ सालापर्यंत ६७ हजार ९०० बेकायदा बांधकामे झाल्याचे उघड झाले. यात तत्कालीन जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, आयुक्त, प्रभाग अधिकारी, लोकप्रतिनिधी या सगळ्यांना जबाबदार धरले होते. हा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला. त्यावर कार्यवाही करण्याचा आदेशही दिला. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी त्यांच्याच दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली किंवा कसे, याची झाडाझडती घेतली, तर दोषींवर कारवाई होऊ शकते. ज्यांनी कारवाईत दिरंगाई केली त्यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे. 

पालिका मुख्यालयही बेकायदा

गोखले यांच्या याचिकेवर अंतिम निकाल आला, तर कल्याण न्यायालय, महापालिका मुख्यालय, महापौर निवास, आयुक्तांचे निवास हेही बेकायदेशीर असून, त्यावरही कारवाई करावी लागेल. वास्तुविशारद संदीप पाटील यांनी ‘रेरा’ प्राधिकरणासह राज्य सरकार आणि महापालिकेची फसवणूक करून महापालिका हद्दीत ६५ बेकायदा इमारतीचे प्रकरण उघडकीस आणले. चौकशीची मागणी करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ६५ बेकायदा इमारती तोडण्याचा आदेश दिला. या इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत. त्यात राहणा-या नागरिकांचे भवितव्य अधांतरी आहे. 

चौकशीदरम्यान ५६ जणांची बँक खाती गोठविण्यात आली. १० जणांना अटक करण्यात आली. बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्यापैकी एकाही बिल्डरला अटक केलेली नाही. संबंधित बिल्डरांनी अटकपूर्व जामीन मिळविला आहे. 

बेकायदा बांधकाम करणारे बिल्डर आणि त्यांना साथ देणारे महापालिकेतील अधिकारी मोकाट आहेत. बेकायदा बांधकामप्रकरणी एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलेले नाही. त्यांच्याविरोधात चाैकशी लावलेली नाही. त्यामुळे बेकायदा बांधकाम केले, तर कारवाई शून्य होते. कायद्याचे भय त्यांना नाही. त्यात सामान्य नागरिक भरडला जातो. तो कर्ज काढून घर घेतो. त्याची लाखो रुपयांची फसवणूक होते, अशा सर्वसामान्यांची भरपाई कोण करून देणार?

२००९ नंतर आतापर्यंत १ लाख ७० हजार बेकायदा बांधकामे झाली, याचे पुरावे गोखले यांनी सादर केले. अशा बांधकामांवर महापालिका ‘बेकायदा बांधकामांच्या कारवाईस अधीन राहून’, असे शिक्के मारून मालमत्ता कराची वसुली करते. 

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका