शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्याची समीक्षा खुजी; ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 08:51 IST

डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते. 

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : साहित्याची समीक्षा करण्यासाठी मराठी वाङ्मय अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडे वाङ्मय अभ्यास कोणी करीत नाही. त्यामुळे मराठी विकसित झालेली नाही. परिणामी मराठी साहित्याची समीक्षा खुजी आणि दुबळी आहे, अशी खंत मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी रविवारी येथे व्यक्त केली.डोंबिवलीतील माउली सभागृहात मराठी साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने खंत व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, शिरीष चिटणीस, सुरेश देशपांडे उपस्थित होते. डॉ. रसाळ यांनी सांगितले की, समीक्षा या प्रकाराकडे लक्ष दिले जात नाही. साहित्याच्या झाडावर बांडगूळ उगवते त्या दृष्टीने समीक्षकाकडे लेखक पाहतात. मराठी साहित्य वाचले जात नसल्याने साहित्याची समीक्षा कोण वाचणार, असा प्रश्न आहे. मराठी साहित्यात समीक्षकांची वानवा आहे. मराठी साहित्याची समीक्षा ही पाश्चात्यांच्या समीक्षेवर अवलंबून राहिली आहे. आपल्या समीक्षकांनी परंपरेशी जोडून घेऊन ती केलेली नाही. मध्ययुगीन समीक्षक नवे लिहणाऱ्याचे काही वाचत नाहीत. नवे लिहिणारे मध्ययुगीन साहित्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या साहित्याची समीक्षा योग्य प्रकारे झालेली नाही. आपल्याकडे दीडशे वर्षांच्या कार्यकाळात मराठीतील एकही ग्रंथ अन्य भाषेत भाषांतरित झालेला नाही, याकडे लक्ष वेधले.

‘आपला समाज आधुनिक कधी होणार’?nनंदी दूध पितो अशी बातमी आज वर्तमानपत्रांतून वाचली. अशा प्रकारची बातमी देणे हेच मुळात चुकीचे आहे. nनंदी दूध पितो यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. एकवेळ परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या पातळीवर श्रद्धा असणे हे असू शकते. समीक्षक म्हणून माझी स्वतंत्र भूमिका असू शकत नाही. nएक विचार करणारा नागरिक म्हणून अशा प्रकारच्या बातम्या देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे या सगळ्यांमधून आपला समाज अजून किती बदलण्याची गरज आहे हे कळते. nआपल्या समाजाचे आधुनिकीकरण कधी होणार असा सवाल ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी विचारला. जेव्हा विचारवंताचा मोठा वर्ग सतत अनेक सामाजिक प्रश्नांवर विचार मांडत राहील तेव्हा या गोष्टी दूर होतील.