शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोविड काळात ‘जीवरक्षक’ ठरलेल्यांना भंगाराचा भाव

By पंकज पाटील | Updated: November 19, 2023 13:43 IST

चार कोटींच्या साहित्यांसाठी ५० लाख मोजण्यास कोणीही तयार नाही

पंकज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : कोविड काळात अंबरनाथ शहरातील असंख्य रुग्णांसाठी जीवरक्षक ठरलेले वैद्यकीय साहित्य आता भंगारात निघण्याची वेळ आली आहे. या साहित्यांना खरेदीदार मिळत नाहीत. हे वैद्यकीय साहित्य विकण्यासाठी सहा वेळा निविदा मागवल्या. मात्र, या निविदा भरणाऱ्यांनी भंगारातील वैद्यकीय साहित्यांना देतात तेवढाही दर दिलेला नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासन हतबल झाले आहे. जवळपास चार कोटी रुपयांच्या या वैद्यकीय साहित्यांसाठी कोणतीही कंपनी ५० लाख रुपये देखील मोजायला तयार नाहीत.

अंबरनाथ नगरपालिकेने कोविड काळात रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तब्बल ६०० हून अधिक बेडचे रुग्णालय अवघ्या काही महिन्यात उभारले होते. या रुग्णालयात सर्व वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. व्हेंटिलेटर, बायपॅक मशीनसह ऑक्सिजन निर्मिती करणारे टँक उभारण्यात आले होते. सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यासाठी त्यावेळी या साहित्याची गरज होती. सर्व साहित्य पालिकेने स्वनिधीतून आणि लोकसहभागातून उभारले होते. 

ऑक्सिजन टँक निकामी होण्याचा धोका गेल्या दोन वर्षांपासून व्हेंटिलेटर, बायपँक, ऑक्सिजन टँक तसेच पडून असल्याने निकामी होण्याचा धोका आहे. या साहित्यांचा योग्य वापर व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने हे वैद्यकीय साहित्य विकण्यासाठी निविदा प्रक्रिया केली. या निविदा प्रक्रियेमध्ये जे दर ठेकेदारांनी भरले ते पाहता सर्व अत्याधुनिक यंत्रे अक्षरश: भंगाराच्या दरात विकण्याची वेळ पालिकेवर आली. चांगला दर मिळावा यासाठी सलग सहा वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. शेवटच्या निविदा प्रक्रियेत जे दर आले त्या दराबाबत देखील पालिका प्रशासन समाधानी नाही.

वाटाघाटीला सुरुवातवैद्यकीय साहित्यांसाठी काढलेल्या निविदेतील दर पाहिले असता नगरपालिकेला ५० लाख रुपये मिळणे देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमुळे आता नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराबरोबर वाटाघाटी करून या वैद्यकीय यंत्रांना चांगला दर मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केल्या आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसambernathअंबरनाथcorona virusकोरोना वायरस बातम्या