शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सण उत्सवावर वारेमाप खर्च करणाऱ्या नगरसेवकांनी मनावर घेतले तर...

By अनिकेत घमंडी | Updated: September 23, 2022 10:46 IST

नागरिकांनो खड्ड्यांवरून आक्रोश करू नका,  विद्यानिकेतन शाळा संस्थापकांनी हाणले शाल जोडीतले

डोंबिवली: खड्ड्यांवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण पेटलेले असतानाच डोंबिवलीत देखील त्याचे पडसाद जनसामान्यांच्यात बघायला मिळत आहेत. येथील विद्यानिकेतन या शाळेने थेट नगरसेवक लोकप्रतिनिधीना टार्गेट करत त्यांना शालजोडीतले हाणले आहेत. ते म्हणतात नागरिकांनो काही काळजी करू नका , नेत्याच्या वाढदिवसाला आणि प्रभागात मिरवायला सणासुदीच्या काळात वारेमाप निधी खर्च करणाऱ्या नगरसेवकांनी शहरातील एकेक वॉर्ड टू वॉर्ड रस्त्याची जबाबदारी घेतली तर एकही रस्त्यावर खड्डा राहणार नाही. नागरिकांना नववर्षाचे कॅलेंडर पाठवणे, ग्रिटींग पाठवणे, उत्सवांना निधी देणे यापेक्षा गैरसोयीची जबाबदारी घ्यावी असे त्यांनी बोचरी टीका करून सुचवले आहे.

शाळेचे संस्थापक ज्येष्ठ दक्ष नागरिक विवेक पंडित यांनी याबाबत आवाज उठवला असून त्यांनी त्यांच्या शाळेच्या मुख्य रूटवर शाळेच्या मागे असे उपरोधिक जनजागृती करणारे फलक।पुन्हा एकदा लावले असल्याने त्याची चर्चा तर होणारच. विशेषत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, अन्य कर्मचारी आदींमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी प्रभागातील नगरसेवकांना याबाबत विचारणा करावी असे पंडित यांना सुचवायचे आहे. सण, उत्सव काळात बक्कळ।खर्च करून प्रभागात होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात येतात, शहर विद्रुप होतेच पण पायाभूत सुविधांची बोंब असल्याने नगरसेवकांनी त्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा पंडित यांनी त्या जनजागृतीद्वारे केली आहे.मध्यंतरी पंडित यांनी कोपर उड्डाणपूल, शहरातील।पायाभूत गरजांच्या असूविधा यांसह खड्डे विषयी परखडपणे स्कुल बस मागे छोटे फ्लेक्स लावून राजकीय, मनपा प्रशासकीय अनास्थेवर आवाज उठवला होता. त्यामुळे शहरातील दुरावस्थेवर काही प्रमाणात अंकुश ठेवला जात असल्याची शेकडो पालक, विद्यार्थ्यांमद्ये चर्चा होते.