शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान जालोर घटनेच्या निषेधार्थ आरपीआय सेक्युलरचा तहसील कार्यालयावर मोर्चा!

By नितीन पंडित | Updated: August 22, 2022 15:25 IST

या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली. 

- नितीन पंडित

भिवंडी : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या छैलसिंह नावाच्या मुख्याध्यापकाने इंद्र देवाराम मेघवाल या ८ वर्षाच्या निरागस दलित विद्यार्थ्याने तहान लागली म्हणून मुख्यध्यापक छैलसिंहच्या मटक्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न केला म्हणून छैलसिंहने आठ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली.

या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून या घटनेचा निषेध करण्यासाठी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तसेच मारहाण करणाऱ्या मुख्यध्यापकाला कठोर शासन व्हावे, या घटनेचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेलार मिठपाडा ते भिवंडी तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चा प्रसंगी सेक्युलरचे कार्यकर्ते आकाश साळुंखे, प्रदीप गायकवाड,अजिंक्य गायकवाड,दिनेश जाधव,अमोल तपासे,रवी सोनावणे यांच्यासह महिला व नागरिकांसह शाळेचे विद्यार्थी व वकील देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार कार्यालयासमोर पोलोसांनी या मोर्चास अडवल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.

यावेळी मयत विद्यार्थी इंद्र मेघवाल हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. त्यांनतर सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांच्यासह शिष्ठमंडळाने भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले. हे निवेदन शालेय विद्यार्थींनी तहसीदारांकडे सोपविले व या घटनेची दाखल केंद्र शासनासह राजस्थान सरकार व देशाच्या राष्ट्रपतींनी घ्यावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावे अशी मागणी केली. 

दरम्यान, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात पाण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण व हत्या होते, ही घटना देशासाठी निंदनीय असून या घटनेस जबाबदार असलेल्या आरोपीस कठोर शासन करावे तसेच अशा प्रकारच्या देशातील घटनांना रोखण्यासाठी केंद्र शासनाने विशेषउपाय योजना करावी अन्यथा आरपीआय सेक्युलरच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी