शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खंबाळपाडा भोईरवाडी तलावातील मृत माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण

By अनिकेत घमंडी | Updated: May 13, 2023 19:37 IST

साथीचे रोग पसरण्याची भीती

अनिकेत घमंडी/डोंबिवली: ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत माशांच्या मुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून राहावे लागत आहे. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तर या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिंती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

खंबाळपाडा येथील तलावात गणपती आणि इतर देवतांचे विसर्जन नित्यनेमाने होत असते. आता उन्हाळा लागल्यामुळे तलावातील पाणी आटले आहे. सदर तलावातील पाणी हिरवे झाले असून ते दूषित झाले असावे असा स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. असे असताना, अचानक आठ दिवसापासून येथे मासे मेल्यानंतर जी भयंकर दुर्गंधी येते. तशी तलावाच्या आसपास दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत शोध घेतला असता, या तलावातील मासे मूर्त अवस्थेत आढळल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे मृत मासे खाण्यासाठी भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या तलावातील पाणी काढून साफसफाई करावी याकरिता काॅ.काळू कोमास्कर आणि   स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता.  मात्र याबाबत कारवाई करण्याबाबत महापालिकेकडून चालढकल  करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

याबाबत फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील यांना विचारले असता, सदर खंबाळपाडा तलावातील  मासे मृत झाल्याची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. तेथे दोन दिवसापूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी औषध फवारणी केली असल्याचे सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली