शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

By मुरलीधर भवार | Updated: January 26, 2024 15:02 IST

यावेळी अग्निशमन व आणिबाणी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कल्याण : आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याणडोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सकाळी ०७.३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या समयी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी ध्वजवंदन करुन तिरंग्याला सलामी दिली. या समारंभात महापालिका शहर अभियंता अर्जुन अहिरे, इतर अधिकारी,  माजी पालिका सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .यासमयी अग्निशमन दल, सुरक्षा दल आणि  स्थानिक पोलीस दल यांनी संचलन करून मानवंदना दिली.

यावेळी अग्निशमन व आणिबाणी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या  १४ गुणवंत सफाई कर्मचा-यांना, उपस्थित अधिकारी व पालिका सदस्य यांचे हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तु प्रदान करून सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे हस्ते मुरबाड येथील नवचैतन्य लोकसंचालित साधना केंद्र यांच्या महिला बचत गटातील शेतकरी महिला सभासदांना  उंबर्डे येथील कंपोस्ट खत विनामूल्य वितरित करण्यात आले.* हे कंपोस्ट खत बचत गटांच्या महिला सदस्यांना दरमहा विनामूल्य स्वरूपात देण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या जुन्या डोंबिवली (पूर्व) विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरीक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी ध्वजवंदन करून तिरंग्यास मानवंदना दिली. याप्रसंगी परिमंडळ 2 चे  उपायुक्त अवधुत तावडे, माजी पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

तद्नंतर आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सचान यांचे बंधू तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीRepublic Dayप्रजासत्ताक दिन २०२४