शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

टाकाऊतून साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 00:32 IST

अशोक बरवे यांचा कलाविष्कार

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : अयोध्येत राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य - दिव्य मंदिर उभे आहे. मात्र, त्याआधीच डोंबिवलीतील अशोक बरवे यांनी त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. हे काम त्यांनी त्यांच्यावर झालेल्या एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर जो चार महिन्यांचा काळ सक्तीची विश्रांती म्हणून घरात बसून घालवला, त्या काळात केले आहे.

टाकाऊतून टिकाऊ यातून त्यांनी एक ते सव्वाफूट उंचीची प्रतिकृती तयार केली आहे. २९ ऑक्टोबरला त्यांच्या उखळीच्या  सांध्याची पुन: शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ४ महिने त्यांना बेडरेस्ट सांगितली होती. या काळात त्यांनी भरपूर वाचन केलेच, पण  मोबाइलवर चित्रपट, व्याख्याने, वेबसिरीजही पाहिल्या. मात्र, नंतर त्याचाही कंटाळा आला. काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्याचवेळी अयोध्येतील श्रीराम मंदिराची चित्रे, दृकश्राव्य ध्वनिचित्रफिती व काही लेखन त्यांच्या पाहण्यात, वाचनात आले. त्यातूनच त्यांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचा चंग बांधला. मंदिराचा आराखडा आधी त्यांनी कागदावर तयार केला. त्यानंतर रद्दी, वह्यांमधील पाने घेऊन त्याच्या घट्ट सुरनळ्या तयार करून मंदिराचे खांब तयार केले. तयार शर्ट, मिठाईचे खोके यापासून बाकीची बांधणी केली. हे सर्व पूर्ण झाल्यावर ॲक्रॅलिक रंगाने मंदिर रंगविले. तसेच वेगवेगळ्या आकाराचे जुन्या इमिटेशन ज्वेलरीमधील मणी त्यावर चिकटवून त्याला आणखी आकर्षक रूप दिले. श्रीरामाच्या प्रेरणेने आणि आशीर्वादानेच हे कार्य हातून घडले, असे त्यांनी सांगितले. आता नवी दिल्ली येथील  ‘अक्षरधाम’ची प्रतिकृती तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

एक महिन्याचा कालावधी बरवे यांना मंदिराची प्रतिकृती साकारण्यासाठी महिना लागला, फेब्रुवारीमध्ये त्यांनी त्या कामाला सुरुवात केली. सगळे साहित्य मिळून अवघे १०० रुपये किंवा त्याहून कमीच लागल्याचे ते म्हणाले. रोज दोन तास त्यासाठी देऊन काम ७ मार्च रोजी पूर्ण झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली