शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पूल, स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी, वारांगनांचे राज्य; जीवघेणे हल्ले, छेडछाड, मोबाइल चोरी यांची मालिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:15 IST

डिसेंबर महिन्यात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकाजवळील परिसरात घडली होती

- प्रशांत मानेलोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : रेल्वेच्या पादचारी पुलावर माथेफिरूने एका तरुणीला मिठी मारल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडल्याने इथल्या सुरक्षेचा मुद्दा पु्न्हा एकदा ऐरणीवर आला. रेल्वेच्या हद्दीतील पादचारी पूल असो अथवा त्याला जोडून असलेला केडीएमसी हद्दीतील स्कायवॉक असो छेडछाड, मोबाइल चोरी, लुटमार आणि जीवघेणे हल्ले याआधीही घडले आहेत. सुरक्षेअभावी अशा घटना आजही सुरूच असताना संबंधित यंत्रणांना शहाणपण मात्र येत नाही.

डिसेंबर महिन्यात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकाजवळील परिसरात घडली होती. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसर, स्कायवॉकवर बिनदिक्कत ठाण मांडणाऱ्या भिक्षेकरी आणि गर्दुल्ले यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्याआधीही स्कायवॉकवर लुटमार आणि छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणीचा गर्दुल्याने पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या तरुणीसह तिच्या मैत्रिणींनी आणि नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला होता. छेडछाडीचा हा प्रकार घडून २४ तास उलटत नाहीत तोच स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल चोरून त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. लुटमारीच्या उद्देशाने पादचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. या घटना आणि पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या  हत्या आणि अत्याचाराच्या घटनेनंतरही शहर पोलिस तसेच लोहमार्ग पोलिस या परिसरावर लक्ष केंद्रीत करून दिवस-रात्र गस्त घालत नाहीत. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणांना काही घेणे देणे नाही, हे पुन्हा एकदा सोमवारी स्पष्ट झाले.

नागरिक असुरक्षित     रेल्वे स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. कल्याण कोर्ट आणि भानुसागर टॉकिजकडे उतरणारा स्कायवॉक तोडण्यात आला आहे. महालक्ष्मी, गुरूदेव हॉटेल परिसरात उतरणारा व स्थानकालगत  असलेला स्कायवॉक अस्तित्वात आहे.     गुरूदेव हॉटेलच्या दिशेकडील स्कायवॉकवर फिरस्ते, गुर्दुल्यांचा, वारांगनांचा उपद्रव कायम असतो. त्यामुळे प्रवासी, नागरिकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. सोमवारी घडलेली घटना रेल्वेच्या हद्दीतील पुलावर घडली असली, तरी यालाच जोडून असलेल्या स्कायवॉकवरचे वास्तव त्याहून भयानक आहे.