शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या आरक्षित भूखंडाचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जाहिर लिलाव

By मुरलीधर भवार | Updated: December 26, 2023 17:18 IST

डोंबिवली महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर आरक्षण टाकले होते.

मुरलीधर भवार,कल्याण: डोंबिवली महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर आरक्षण टाकले होते. हे आरक्षण विकसीत केले गेले नाही. त्यामुळे बाजार समितीने महापालिका प्रशासनास विचारात न घेता या आरक्षित भूखंडाचा जाहिर लिलाव सुरु केला आहे. त्यासाठी जाहिर प्रसिद्ध केली आहे. यावरुन काेट्यावधी रुपो किंमतीच्या भूखंडाचे महापालिकेस काही साेयरसूतक नसल्याचे उघड झाले आहे.

बाजार समितीचे सभापती कपील थळे यांच्या सहीनिशी बाजार समितीकडून एक जाहिर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बाजार समितीच्या जागेवर महापालिकेने ३ हजार ३३८ चौरस मीटर जागेवर पाेस्ट आ’फिस आणि पिकनिक स्पा’टकरीता आरक्षण टाकण्यात आले होते. या जागेवरील आरक्षण महापालिकेने विकसीत केले नाही. त्यामुळे महापालिकेच्या या आरक्षित भूखंड जसा आहे तसा भाडे करारावर देण्याचा लिलाव जाहिर केला आहे.

या प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, अशा प्रकारे आरक्षित भूखंड भाड्यावर देता येत नाही. हा प्रकार बेकायदेशीर आहे. मात्र जाहिर लिलाव निविदा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी बाजार समितीने महापालिकेस काही एक कळविले नाही. याविषयीचे पत्र महापालिकेस बाजार समितीकडून प्राप्त झालेले नाही.

बाजार समितीचे उपसचिव कनीक पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितेल की, जागा बाजार समितीची आहे. त्यावर आरक्षण महापालिकेने टाकले. त्याला दहा वर्षे झाली तरी महापालिकेने आरक्षण विकसीत केले नाही. त्यामुळे लिलाव जाहिर केला आहे. त्यात बेकायदेशीर काही नाही.मात्र जे. पी. फिशींग अँड रिसॉर्ट कंपनीचे भागीदार जावेद पठाण यांनी बाजार समितीच्या लिलावास हरकत घेतली आहे. कंपनीचे भागीदार पठाण यांनी सांगितले की, ४९ हजार चौरस मीटरचा भूखंड महापालिकेने करारनामा करुन बीआेटी तत्वावर विकसीत करण्यासाठी ३० वर्षे कालावधीकरीता दिला होता. हा भूखंड कंपनील हस्तांततरीत केल्याशिवाय महापालिकेने कंपनीकडून भाडे वसूल करु नये असा आदेश न्यायालयाचा होता. तरी देखील कंपनीने आत्तापर्यंत १ कोटी पेक्षा जास्त भाडे महापालिकेस भरले आहे. जागा महापालिकेने हस्तांतरीत न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने २ महिन्यात जागा हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले. महापलिका अपिलात गेली. उच्च न्यायालयाने अपील सेशन कोर्टात पाठविले. सेशनने अपील रद्द केले. त्यानंतही ताबा मिळाला नाही म्हणून २०२३ साली अवमान याचिका दाखल केली. कंपनीच्या करारनाम्यातील २२०० मीटरची जागा बाजार समिती लिलावात कशी काय काढू शकते असा सवाल उपस्थित केला आहे. अनन्था या प्रकरणी सुद्धा न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा बाजार समितीला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMuncipal Corporationनगर पालिका