शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक संचालकांच्या घरासमोर आंदोलन गरजेचे : रवींद्र चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 07:12 IST

विनाअनुदानित प्रस्तावाला शासनाचा विरोध; 'सेव्ह पेंढरकर' ला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: 'सेव्ह पेंढरकर कॉलेज' या आंदोलनाला माझा आणि भाजपचा जाहीर पाठिंबा आहे. विनाअनुदानितच्या प्रस्तावाला शासनाचा कायम विरोध राहणार आहे. संचालकांनी उच्च न्यायालयात शासनाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. तेथे लढण्यासाठी चांगला वकील देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांची बाजू लावून धरेल आणि न्याय मिळवून देईल. परंतु, सध्या पुकारलेले आंदोलन मर्यादित न राहता प्रत्येक संचालकाच्या घरासमोर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी साखळी उपोषणस्थळी आयोजित जाहीर सभेत केले. पेंढरकर कॉलेजच्या गेटसमोर साखळी उपोषणाच्या ठिकाणी रविवारी संध्याकाळी जाहीर सभा झाली.

...अशा वृत्तीला आम्ही ठेचून काढूयावेळी विशेष बाब म्हणजे डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांचे पुत्र अजिंक्य देसाई यांच्यासह कॉम्रेड क्रांती जेजुरकर, माजी शिक्षक व रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेला मंत्री चव्हाण यांनी उपस्थिती लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. चव्हाण म्हणाले, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, या उद्देशाने अनुदानित महाविद्यालये सुरू केली आहेत. या उद्देशाला कोण हरताळ फासत असेल तर आणि ज्याला हे महाविद्यालय सरकारने सांभाळायला दिलेय, तो मालक म्हणून मनमानी करत असेल तर आमचा विरोध आहेच, पण अशा वृतीला आम्ही ठेचून काढू, असा इशारा त्यांनी दिला.

...तर पदवीधर आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारमंत्री चव्हाण यांच्या आगमनापूर्वी आंदोलनाचे संयोजक माजी विद्यार्थी सोनू सुरवसे आणि अन्य माजी विदयार्थी, आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शंभर टक्के अनुदान बंद करण्याचा घाट इथल्या संचालकांनी घातला आहे. परंतु, पदवीधर निवडणुकीनिमित्त राजकीय मंडळी इतर शाळा, महाविद्यालयांना अनुदान देण्याची घोषणा करीत आहेत. त्यांचे पेंढरकर महाविद्यालयाकडे दुर्लक्ष झाले आहे. २६ जूनपर्यंत के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयावर प्रशासक नेमला नाही, तर पदवीधर निवडणुकीसह, विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. 

एक घाव दोन तुकडे कराआंदोलनाचा लढा लवकरात लवकर संपविणे गरजेचे आहे. आजी, माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यातच एक घाव दोन तुकडे करायला हरकत नाही. गरज लागल्यास कॅबिनेट बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी विनंती अजिंक्य देसाई यांनी उपस्थित राजकीय पदाधिकाऱ्यांना केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली