शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेखा ईटकर नव्या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

By मुरलीधर भवार | Updated: April 19, 2024 15:47 IST

आपल्या सामाजिक उपक्रम आणि कार्यांमुळे जनमानसात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली.

मुरलीधर भवार, कल्याण : आपल्या सामाजिक उपक्रम आणि कार्यांमुळे जनमानसात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड आणि आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्या प्रमूख उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला. ज्यामध्ये नव्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. सुरेखा ईटकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारपदासोबतच नव्या विश्वस्त, कार्यकारिणी समिती सदस्य, राज्य आणि केंद्रीय प्रतिनिधींचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली.

आयएमए कल्याणच्या अतिशय प्रशस्त आणि सुसज्ज हॉलमध्ये हा नविन पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न झाला. ज्यामध्ये मावळत्या अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे यांच्याकडून डॉ. सुरेखा ईटकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. तर उपाध्यक्षपदी डॉ. सोनाली पाटील, सचिवपदी डॉ. शुभांगी चिटणीस, सहसचिवपदी डॉ. राजेश राजू, खजिनदारपदी डॉ. विकास सुरंजे यांची नियुक्ती करण्यात आली.

आयएमएच्या या प्रमुख पदांसह विश्वस्त म्हणून डॉ. प्रदीप कुमार सांगळे, डॉ. राजन माने, डॉ. नरेंद पाठक, कार्यकारिणी समिती सदस्यपदी डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. तन्वी शहा, डॉ. दीप्ती दिक्षीत, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. मनोज पाटील आणि डॉ. राहुल तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच राज्यस्तरीय सदस्यपदी डॉ. संजय गोडबोले, डॉ. विवेक भोसले, डॉ. प्रशांत खताळे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. विक्रम जैन यांची आणि केंद्रीय सदस्यपदी डॉ. प्रदीपकुमार सांगळे, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. प्रविण भुजबळ, डॉ. स्नेहलता कुरीस आणि डॉ. राजन माने यांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली. तर वेब आणि बुलेटिन संपादकपदी डॉ. अभिजीत सिंह यांचे नाव जाहीर करण्यात आले.

कोवीड काळात केलेल्या कामामुळे तसेच गेल्या काही वर्षांत शहरासाठी राबवलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे इंडीयन मेडीकल असोसिएशनने कल्याणकरांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. कल्याण शहराच्या भल्यासाठी आणि कल्याण शहराचे नाव देशपातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ठराविक संस्थांपैकी आयएमए कल्याण ही प्रमूख संस्था आहे. विशेषतः काही दिवसांपूर्वीच अतिशय उत्साही आणि थाटात साजऱ्या झालेल्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यशस्वी आयोजन करून आयएमए कल्याणने मैलाचा नवा दगड रचला आहे.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, कल्याण दिवाणी वकील संघटनेचे ॲड. जयदीप हजारे, रोटरी क्लबचे विजय वैद्य यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांचे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका