शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दीपक गायकवाड याने साडे तीन हजार लोकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती

By मुरलीधर भवार | Updated: January 6, 2024 16:10 IST

जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा नागरीकांचा आरोप

कल्याण-पत्नी आणि मुलांची हत्या करणाऱ्या दीपक गायकवाड याने चार जवळपास ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या नागरीकांनी पोलिसांकडे केली आहे. फसवणूक झालेल्या नागरीकांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती घेटे यानी नागरिकांना दिली आहे.काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणाऱ्या खेळणी विक्री व्यावसायिक दीपक याने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केली. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दीपक गायकवाड याला अटक केली. दीपक याच्या वरिोधात अटकेची कारवाई केल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी दीपक याच्यासह त्याच्या साथीदार आणि कुटंबियांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात दीपक वगळता अन्य कोणावरही कारवाई झालेली नाही. कारवाईची मागणी सातत्याने होत आहे. या दरम्यान शनिवारी सकाळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली.

यावेळी प्रत्येक नागरिकांनी त्यांची व्यथा घेटे यांच्याकडे मांडली. अरविंद माेरे यांनी सांगितले की, दीपक याने विविध कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. जवळपास ३ हजार ५०० लोकांनी गायकवाड यांच्याकडे पैसे गुंतविले होते. जास्तीचा परतावा देण्याच्या नावाखाली दीपक गायकवाड याने नागरिकांना फसविले आहे. यावेळी घेटे यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे. पुढील कारवााईही होणार आहे. नागरीकांनी जास्तीचे पैसे कमाविण्याच्या आमिषापोटी पैसे दिले होते. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता गुंतवणूक केली आहे. दीपक काय करतो याची माहिती नागरिकांनी घ्यायला पाहिजे होती. पैसे गुंतविले हे मान्य आहे. त्याचा तपास ही केला जाणार आहे. परंतु नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

टॅग्स :kalyanकल्याण