शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मतदाराच्या नावांची पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, पालिकेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 14:29 IST

KDMC : महापालिका भवनात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केलं आहे.

कल्याण : प्रारूप मतदान यादीतील मतदाराच्या नावांची पडताळणी करण्यासाठी आणि नवमतदारांची व दिव्यांगांची मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे , असं आवाहन  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार  यांनी केलं आहे.               महापालिका भवनात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केलं आहे. ही बैठक मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत/ मतदारांपर्यंत पोचण्याच्या अनुषंगाने  जनजागृती करण्यासाठी तसेच त्याबाबतची  माहिती सर्व पक्षांना अवगत करन्यासाठी आयोजित करण्यात आली होती.  दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर या काळात राबविल्या जाणाऱ्या या मतदार पुनरीक्षण अभियानात नवीन नाव नोंदविणे, नावे वगळणे, मतदाराचे नाव दुरुस्त करणे ही कामे करता येणार आहेत.  

     राजकीय पक्षांनी प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यावर त्याची आपल्या स्तरावर पडताळणी करून सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे.  प्रारुप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत यादीबाबत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत. 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकालात काढून 5 जानेवारी 2022 पर्यंत मतदार यादी अंतिम करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.  

1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकास मतदानाचा हक्क प्राप्त होणार आहे. महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या दहा प्रभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात मतदान नोंदणी अर्ज नागरिकांसाठी/ मतदारांसाठी उपलब्ध करून ठेवले आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका