शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचाली, शरद पवारांचा मास्टर स्ट्राेक; राजू पाटील यांचे वक्तव्य

By मुरलीधर भवार | Updated: May 2, 2023 21:20 IST

मनसे आमदार पाटील याच्या हस्ते आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील मनसेच्या शाखे शुभारंभ करण्यात आले. 

कल्याण- आज शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरुन पायउतार हाेण्याची घाेषणा केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या राजकीय हालचाली थांबविण्याकरीता शरद पवार यांचा हा मास्टर स्टाेक असावा असे वक्तव्य मनसे आमदार पाटील यांनी केले आहे. अजित पवार यांच्या बाबतीत सुरु असलेल्या चर्चेनंतर शरद पवार यांनी जाे निर्णय घेतला आहे. त्यावर मनसे आमदार पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज शरद पवार याच्यावरील लाेक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात पवार यांनी हा निर्णय जाहिर करताच राजकारणात एकच खळबळ माजली आणि विविध राजकीय चर्चांना उधाण आले. 

मनसे आमदार पाटील याच्या हस्ते आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील मनसेच्या शाखे शुभारंभ करण्यात आले. कल्याण डाेंबिवली महापालिका निवडणूकीत मनसे काेणाशी हातमिळवणी करणार का असा सवाल पाटील यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, अजिबात नाही. आम्ही आत्तापर्यंत काेणाशीही हातमिळवणी केलेली नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आम्हाला तसे आदेशही नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे की स्वतंत्रपणे निवडणूका लढवावी. कल्याण डाेंबिवलीचा विचार केल्यास एक वेळेस आम्ही सत्तेच्या जवळ जाऊन आलाे. मात्र सत्तेचा विचार केला नाही. 

महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडतात. त्यावर पाटील यांनी सांगितले की, अर्थातच या गाेष्टी पाहून आम्हाला दुखच हाेते. जी कामे असतात ती बाजूला राहतात. त्यांच्या तडजाेडीच्या राजकारणात ते व्यस्त असतात. त्यामुळे लाेकांची कामे हाेत नाही. लाेकांची कामे रेंगाळली जातात. एक स्थीर सरकार हे देशाच्या राज्याच्या हिताचे असते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaju Patilराजू पाटील