शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनासाठी केडीएमसीसह पोलिस यंत्रणा सज्ज

By प्रशांत माने | Updated: September 8, 2022 17:15 IST

विसर्जनाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण: उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी कल्याण डोंबिवली शहरातील १६३ सार्वजनिक मंडळाचे आणि १० हजार ९५  घरगुती अशा १०  हजार २५८ गणपतींचे विसर्जन होणार आहे. विसर्जनाच्या वेळी वाहतूककोंडी होवू नये व विसर्जन प्रक्रिया सुरळीत व्हावी या दृष्टीकोनातून केडीएमसी, वाहतूक आणि शहर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील गणेशघाट विसर्जनासाठी सुसज्ज ठेवले असताना ऑन कॉल विसर्जन , कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी आदि उपक्रम देखील मनपाकडून राबविले जाणार आहेत.

कल्याणमध्ये ३२ तर डोंबिवली ३७ विसर्जनस्थळे आहेत. दुर्गाडी, जुनी डोंबिवली, कुंभारखाणपाडा, मोठा गाव ठाकुर्ली यासह अन्य गणेशघाट विसर्जनस्थळांसह शहर आणि ग्रामीण भागातील तलाव अशा २३ ठिकाणी मनपाकडून गोताखोर आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभारखाणपाडा, दुर्गाडी आणि मोठा गाव ठाकुर्ली अशा मोठ्या विसर्जन गणेशघाटांच्या ठिकाणी इंजिन रबर बोट देखील ठेवली जाणार आहे. ६९ विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ६७ जनरेटर, २ हजार ४५५ हॅलोजन, ८८ टॉवर आणि सुरक्षेसाठी १६८ सीसीटिव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. तर दोन्ही शहरात मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये २ हजार १७० सीसीटीव्ही कॅमेरांची करडी नजर राहणार आहे. 

विसर्जनाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून वाहतूक आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून पोलिस अधिकारी, होमगार्ड, एसआरपीच्या तुकडया विसर्जनादरम्यान ठिकठिकाणी तैनात राहणार आहेत. वाहतूककोंडी होवू नये म्हणून अवजड वाहनांना बंदी घालण्याबरोबरच कल्याण शहरातील वाहतूकीत बदल देखील करण्यात आले आहेत. काही ठिकाणी एकदिशा मार्गाने वाहतूक चालविली जाणार आहे. त्याचे पालन वाहनचालकांसह गणेशभक्तांनी करावे असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका