शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील पाळणाघरात मुलांचा शारीरीक आणि मानसिक छळ, व्हिडिओतून धक्कादायक प्रकार उघड

By मुरलीधर भवार | Updated: March 20, 2024 15:16 IST

तीन जणां विरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली -डोंबिवलीत एका पाळणा घरात लहान मुलांचा शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ््याने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. आधी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. नंतर पाळणाघर चालविणाऱ््या पती पत्नीसह तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या व्हिडिओत लहान मुलांना बांधून ठेवणे, त्यांना उलटे करणे. त्यांना मारहाण करुन भिती दाखविणे हे धक्कादायक प्रकार दिसत आहेत.डोंबिवलीत हॅपी किड डे केअर हे पाळणा घर आहे. डोंबिवलीत राहणारे मंदार आेगले आणि त्यांची पत्नी अनुजा आणि तीन वर्षाची मुलगी गार्गी सोबत राहतात. मंदार हे सरकारी गाडीवर चालक आहेत. त्यांची पत्नी अनुजा ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दोघेही सकाळी सात ते रात्री आठ वेळेत कामावर जातात. त्यांच्या घरी त्यांची मुलगी गार्गी हिची काळजी घेण्यासाठी कोणी नसल्याने ते त्यांची गार्गी हिला हिला हॅपी किड डे केअर या पाळणा घरात ठेवतात. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी मंदार यांना सांगितले की, ज्या पाळणा घरात तुम्ही तुमच्या मुलीला ठेवतात. त्या मुलीसोबत काय प्रकार घडतो. त्याचा व्हीडीआे आमच्या हाती आला आहे. तत्काळ मंदार यांनी कविता गावंड यांच्याशी संपर्क साधला. शिवसेना महिला पदाधिकारी यांच्यासोबत मंदार आणि अन्य पालकांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. आधी चाईल्ड वेलफेअर कमिटीला जाऊन तक्रार द्या नंतर पाहू असे सांगितले. तक्रार दाखल करुन घेतली नसल्याने हे प्रकरण सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्याकडे गेले. हा प्रकार ऐकून सहाय्यक आयुक्त कुराडे यांनी या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश रामनगर पोलिसांना दिले. पोलिसांनी पाळणाघर चालविणारे गणेश प्रभूणे, त्यांची पत्नी आरती प्रभूणे आणि त्याठिकाणी काम करणारी राधा नाखरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण साधना सामंत या महिलेच्या पुढाकाराने समोर आले आहे. साधना सामंत ही महिला १ मार्च ला या पाळणा घरात कामाला लागली होती. तिने मुलांसोबत होत असलेला प्रकार पाहून व्यथीत झाली. तिने पाळणा घरात काम न करण्याचे ठरविले. तसेच हा प्रकार मुलांच्या पालकांपर्यंत कसा पोहचेल याची सुरुवात केली. त्यासाठी तिने पाळणा घरात होत असलेल्या मुलांचा छळवणूकीचा व्हिडिओ काढला होता. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली