शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेतील टेंडरवॉर संपेना, माजी उपमहापौर भालेराव यांची न्यायालयात याचिका

By सदानंद नाईक | Updated: February 27, 2024 19:44 IST

४२.५० कोटीतील तिसरे टेंडर बेकायदा दुसऱ्या ठेकेदाराला कसे दिले? असा प्रश्न रिपाइंचे भगवान भालेराव यांनी करून त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर : शासनाच्या मूलभूत सुखसुविधाच्या ४२.५० कोटीच्या निधीतून १६१ विकास कामे निविदाविना विभागून दिल्याने, यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी केला. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून शुक्रवारी याची सुनवाई असल्याची माहिती भगवान भालेराव यांनी दिली आहे. 

उल्हासनगरात हजारो कोटीचे विकास कामे सुरू असून यामध्ये १०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून दिली होती. तसेच ४२.५० कोटीच्या शासनाच्या मूलभूत सुखसुविधा मधील १६१ विकास कामाबाबत प्रश्नचिन्हे उभे केले. 

याबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख यांना भाजपच्या तब्बल २२ नगरसेवक व आमदार आयलानी यांनी कारवाईची लेखी मागणी केली होती. मात्र याबाबत कारवाई झाली नसल्याने, यामध्ये रिपाईने उडी घेतली. ४२.५० कोटीतील तिसरे टेंडर बेकायदा दुसऱ्या ठेकेदाराला कसे दिले? असा प्रश्न रिपाइंचे भगवान भालेराव यांनी करून त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या मूलभूत सुखसुविधेच्या ४२.५० कोटीच्या निधीतून एकून १६१ विविध विकास कामे निविदा न काढता विभागून ३ ठेकेदाराना देण्यात आली. तशीच असे अनेक कोटीचे विकास कामे दिल्याचा आरोप केला. महापालिकेत प्रशासक व आयुक्त म्हणून आयुक्त अजीज शेख हे यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरल्याचे म्हणाले. ४२६ कोटींची भुयारी गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा योजना, १५० कोटीचे मुख्य ७ रस्त्याचे काम असे हजारो कोटीचे कामे सुरू आहेत. यामध्येही अनियमितता असल्याचा आरोपही भालेराव यांनी करून याबाबतही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे म्हणाले. 

भालेराव यांचा रोख आयुक्तांकडे? शासनाच्या मूलभूत सुखसुविधेची ४२.५० कोटीचे कामे वादात सापडल्याने, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. रिपाइंचे भालेराव यांनीही याप्रकाराला आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यांचा रोख आयुक्त शेख यांच्या कारभारावर होता. 

पत्रकार परिषदेला भाजप पदाधिकारी महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही रिपाईच्या पत्रकार परिषदेला आल्याची माहिती भाजपचे पदाधिकारी कपिल अडसूळ यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी दिली. तसेच वरिष्ठ नेत्याकडे हा विषय नेल्याचे अडसूळ म्हणाले.

 अभियंता जाधव हटाओ महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांच्या कारभारावर प्रश्नचिन्हे उठवून हटाओची मागणी केली. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर